Dhule News: साक्री तालुक्यात वाघाचा धुमाकूळ, पोल्ट्री फार्ममध्ये घुसला अन्...

या घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
धुळे:

साक्री तालुक्यातील बल्हाणे शिवारात एका पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे गावामध्ये भितीचं वातावरण आहे. हा वाघ चेतन भीमराव बिरारीस यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये घुसला होता. त्यात त्याने 50 हून अधिक कोंबड्या फस्त केल्या आहेत.  सुदैवाने पोल्ट्री फार्ममध्येच झोपलेले रखवालदार आणि त्यांचे कुटुंबीय प्रसंगावधान राखून तात्काळ एक खोलीत गेले. त्यामुळे त्यांचा जीव बचावला. पण त्यांनी तो थरार अनुभवला. 
 
या घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.  वनविभागाचे अधिकारी आणि पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी पंचनामा केला. प्रथमदर्शनी नागरिकांनी तो पांढऱ्या पट्टेदार वाघासारखा असल्याचे सांगितले. या घटनेमुळे पोल्ट्री मालक चेतन बिरारीस आणि अविनाश पाटील यांच्यासह स्थानिक शेतकरी घटनास्थळी दाखल झाले होते. 

नक्की वाचा - Ladki Bhahin Yojana: लाडक्या बहीण योजनेतून आता 26 लाख लाडक्या बहीणी आऊट, दिलं 'हे' कारण

काही दिवसांपूर्वीच या परिसरात पट्टेदार वाघ दिसल्याचे स्थानिक शेतकरी आणि गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आज पुन्हा वाघाचा संचार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. वन विभागानेही या वाघाचा शोध सुरू केला आहे. शिवाय गावकऱ्यांनी घाबरून जावू नये असे आवाहन ही करण्यात आले आहे. 
 

Advertisement