राकेश गुडेकर
डायबेटीस म्हणजेच मधुमेह झाला की खाण्या पिण्याच्या गोष्टींवर बंधनं येतात. अनेकांना भात खाल्ल्या शिवाय जेवण पुर्ण झालं असं वाटत नाही. अशा व्यक्तीला तर मधुमेह झाला असेल तर त्याच्या अडचणी आणखीनच वाढतात. मधुमेह झाल्यानंतर सर्वात आधी जर कोणतं बंधन त्या रुग्णावर येत असेल तर ते भात न खाण्याचं असतं. पण आता मधुमेह झालेल्या रुग्णांसाठी खूश खबर आहे. त्यांना बिनधास्त पणे भात खाता येणार आहेत. हे शक्य झालं आहे, कोकण विद्यापीठाच्या एका संशोधनामुळे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मधुमेह झाल्यानंतर गोड पदार्थ खाण्यास डॉक्टर बंदी घालतात. तसेच भात खाण्यावरही बंधन येतात. भात न खाण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. पण भात खाल्ल्याशिवाय अनेकांना जमत नाही. भात नसेल तर जेवणच पूर्णच होत नाही. पण मधुमेहींसाठी आता खूशखबर आहे. ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी असलेली रत्नागिरी सात ही भाताची नवी जात शोधण्यात आली आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या रत्नागिरी शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्राला ही नवी जात शोधण्यात यश आलं आहे.
या भातात ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी आहे. शिवाय प्रोटीन्सचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हा भात मधुमेहींना बिनधास्त खाता येणार आहे. विविध प्रकारच्या भातामध्ये ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण 55 टक्क्यांपेक्षा अधिक असते. त्यामुळे मधुमेही भात खाणेच टाळतात. यावर संशोधन सुरू होते. त्यातून ग्लासेमिक इंडेक्सचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा कमी असणारे वाण तयार करण्यात यश आलं आहे. आणखी देखील काही भाताच्या जातींवर संशोधन सुरू आहे, अशी माहिती कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. विजय दळवी यांनी दिला आहे.
ज्या भाताचे वाण रत्नागिरी सात या नावाने ओळखले जाणार आहे. हा रंगाने लाल आहे. यात आयर्न आणि झिंग जास्त प्रमाणात आहे. शिवाय कार्बोहायड्रेडचे प्रमाणही यात कमी आहे. इतर भातामध्ये कार्बोहायड्रेडचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते मधुमेह असलेल्यांसाठी धोकादायक करते. त्यामुळे तो भात खाता येत नाही असं डॉ. विजय दळवी सांगतात. मात्र रत्नागिरी सात या भातात कार्बोहायड्रेडचे प्रमाण कमी आहे. शिवाय तो पचनासाठी ही चांगला आहे असं दळवी सांगतात. हा तांदूळ 115 दिवसात तयार होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world