'दापोली मतदार संघ तुमची जहागिरी नाही' भाजपने रामदास कदमांना सुनावलं, वाद पेटणार?

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि भाजप यांच्यातून विस्तवही जात नाही अशी स्थिती आहे.आधी रामदास कदम यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला. आता भाजपने त्याची सव्याज परतफेड करत जशाच तसे उत्तर दिले आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
रत्नागिरी:

विधानसभा निवडणुकांची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. त्यामुळे अनेक मतदार संघात दावे प्रतिदावे केले जात आहेत. शिवाय मित्र पक्षालाच टिकेचे धनी केले जात आहे. असचं काहीसं घडत आहे ते दापोली विधानभा मतदार संघामध्ये. या मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि भाजप यांच्यातून विस्तवही जात नाही अशी स्थिती आहे.आधी रामदास कदम यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला. आता भाजपने त्याची सव्याज परतफेड करत जशाच तसे उत्तर दिले आहे. त्यामुळे इथे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात वाद पेटण्याची दाट शक्यता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

'दापोली मतदार संघ कदमांची जहागिरी नाही' 

दापोली मतदार संघात सर्वात जास्त त्रास हा भाजपचा होत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते  रामदास कदम यांनी केला होता. त्याला आता भाजपनेही जशाच तसे उत्तर दिले आहे. दापोली विधानसभा मतदारसंघ ही काय तुमची मालकी झाली का ? या मतदारसंघात अन्य कुणी विकास कामांची भूमिपुजने करायची नाही का ? हा मतदारसंघ म्हणजे कोणाची जहागिरी नाही असे जोरदार प्रत्युत्तर भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी दिले आहे. महायुतीचे लोकसभेचे उमेदवार सुनिल तटकरे यांना दापोली विधानसभेतून मताधिक्य मिळाले नव्हते. त्याला रामदास कदम यांनी केलेली वक्तव्यच जबाबदार असल्याचा आरोपही साठे यांनी केला आहे. शिवाय दापोली विधानसभेची जागा भाजपने लढवावी अशी मागणी वरिष्ठांकडे केली आहे असेही साठे यावेळी म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - LIVE : विधान परिषदेत जोरदार गोंधळ, कामकाज 10 मिनिटासाठी तहकूब

काय म्हणाले होते रामदास कदम? 

दापोली विधानसभा मतदार संघात सर्वात जास्त त्रास हा भाजपचा आहे असा आरोप रामदास कदम यांनी केला होता. भाजपकडून या मतदार संघात योगेश कमद यांना काम करू दिले जात नाही असेही ते म्हणाले होते. त्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हण हे जबाबदार असल्याचेही ते म्हणाले होते. शिवाय चव्हाण हे आमच्या मुळे मंत्री झाले आहेत. आम्ही उठाव केला नसता तर ते मंत्री झाले नसते असेही ते म्हणाले होत्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीत तणावाचे वातावरण झाले होते. मात्र आता त्याला स्थानिक नेत्यांनीच प्रत्युत्तर देत रामदास कदम यांना थेट आव्हानच दिले आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - अर्थसंकल्पावर शरद पवारांचे अजित पवारांना चिमटे, घर वापसीवर ही बोलले

कदम विरूद्ध भाजप वाद पेटणार? 

रामदास कदम शिवसेनेत असताना त्यांनी अनिल परब यांच्यावर आरोप केले होते. शिवाय आपल्याला पराभूत करण्यात स्वपक्षीय होते असा आरोपही त्यांनी केला होता. शिवाय योगेश कदम यांना पाडण्याचे षडयंत्रही रचले गेले होते असा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि एकनाथ शिंदेंना साथ दिली. आता त्यांनी शिंदे गटात असताना भाजपवर आरोप केला आहे. आता त्यांना भाजपचा त्रास होत आहे. भाजपवर गंभीर आरोप करत, आपल्याला त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपनेही त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यामुळे हा वाद शमण्याची शक्यता दिसत नाही. त्यात आता भाजपने दापोली विधानसभेवरच दावा केला आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दापोली मतदार संघातून महायुतीच्या उमेदवाराला लिड मिळाले नव्हते. हाच मुद्दा आता भाजपे मोठा केला आहे. त्यामुळे कदम यांच्या पुढे अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. 

Advertisement