Dowry Cases : मुंबईत हुंड्यासाठी सर्वाधिक छळ, महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचाराची धक्कादायक आकडेवारी

ही आकडेवारी शहर तसेच ग्रामीण भागात खोलवर रुजलेल्या हुंडा प्रथा आजही कशी आहे हे दाखवते.

जाहिरात
Read Time: 2 mins

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्रातील हुंडाबळीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जात आहे. आधुनिक जगात पाऊल ठेवताना आता हुंडा घेतला जात नसल्याचं अनेकांना वाटत असलं तरी परिस्थिती वेगळी आहे. अद्यापही महिलांना श्रीमंत, सुशिक्षित घरात हुंड्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पुणे, मुंबईमध्ये विवाहित महिलांच्या सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येमुळे गंभीर गोष्टी उघडकीस आल्या आहेत. महाराष्ट्रात दररोज किमान 32 महिलांचा छळ केला जातो. साडेतीन वर्षांत जवळपास 40,000 गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र अनेकदा तक्रारी नोंदवल्या जात नसल्याचंही समोर आलं आहे. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Nashik News : वैष्णवी हगवणेसारखीच नाशिकमधील घटना, पैशांसाठी सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून भक्तीने संपवलं जीवन 

सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला बळी पडणाऱ्या महिलांची संख्या औपचारिक तक्रारी दाखल करणाऱ्यांपेक्षा खूप जास्त आहे. अनेक महिलांना तर तक्रारही दाखल करता येत नाही. वैष्णवी आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महिलांवरील छळाचे भीषण वास्तव समोर आलं आहे. महाराष्ट्रात 1 जानेवारी 2022 मे ते 2025 या 1237 दिवसांच्या कालावधीत महिलांवरील छळाच्या एकूण 39,665 प्रकरणांची नोंद झाली आहे. अनेक विवाहित महिला वैष्णवी हगवणेप्रमाणे सतत चालणाऱ्या अत्याचारामुळे टोकाचे पाऊल उचलतात. अशा काही महिलांनी ‘भरोसा सेल'कडे मदतीसाठी धाव घेतली असली तरी बहुसंख्य महिला तक्रारही दाखल करू शकत नाहीत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Advertisement

दररोज महाराष्ट्रात हुंड्यासाठी किती महिलांचा छळ होतो?

2022: 11,982
2023: 11,770
2024: 11,177
2025 (1 जानेवारी - 22 मे): 4,736
एकूण: 39,665


मुंबई आणि पुणे आघाडीवर...

1 जानेवारी 2022 ते 22 मे 2025 या कालावधीत सर्वाधिक छळाच्या केसेसची नोंद झालेली प्रमुख जिल्हे खालीलप्रमाणे आहेत:
    •    मुंबई – 412 प्रकरणे
    •    पुणे – 229
    •    छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) – 288
    •    बीड – 243
    •    नाशिक – 237
    •    अहमदनगर – 196
    •    जालना – 175
    •    धुळे – 180
    •    नांदेड – 121