Dr. Gauri Garje Suicide Case: सध्या राज्यात पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंच्या पत्नीचे आत्महत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. पती अनंतचे अफेयर, मानसिक छळाला कंटाळून वरळीमध्ये डॉ. गौरी गर्जेंनी आत्महत्या केली. मात्र ही आत्महत्या नसून हत्याच आहे, असा गंभीर आरोप गौरीच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणात आता सर्वात मोठा आणि खळबळजनक खुलासा झाला आहे.
ॲमेझॉन बुकिंगमुळे समोर आलं जुन प्रकरण!
संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या डॉ. गौरी गर्जे- पालवे प्रकरणामध्ये दररोज नवनवे खुलासे होत आहेत. अनंतचे किरण नावाच्या एका महिलेबरोबर संबंध होते. अनंतसोबतच्या संबंधांतून ती गरोदरही होती. 2021 मध्ये तिचा गर्भपात करण्यात आला. मात्र 2021 नंतरही अनंत संबंधित महिलेच्या संपर्कात होता. दोघांमध्ये चॅटिंग, फोटो पाठवणे सुरु होते. गौरीला त्यांच्या या संबंधांचा सुगावा एका ऑनलाईन ऑर्डरमुळे लागला.
आनंद गर्जेचे हेल्मेट हरवल्यानंतर नवे हेल्मेट घेण्यासाठी ॲमेझॉनवर बुकिंगसाठी गौरीने अनंतचा फोन हातात घेतला. त्याचवेळी गौरीला अनंतच्या फोनमध्ये त्या महिलेसोबतचे चॅटिंग आणि फोटो दिसले. हा प्रकार पाहून गौरीला जबर धक्का बसला. तेव्हापासून गौरी आणि अनंतच्या संसारात वादळ आले, दोघांमध्ये वाद-विवाद सुरु झाले.
याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही मोठा खुलासा केला होता. घर बदलताना गौरीला काही कागदपत्रे सापडली. त्यात किरण इंगळे नावाच्या महिलेचे वैद्यकीय दस्तऐवज होते, ज्यात पती म्हणून अनंत गर्जेचे नाव नमूद होते. यावरूनच गौरी आणि अनंतमध्ये वाद सुरु झाल्याचे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, गौरी गर्जीने पती पत्नीच्या वादातील प्रत्येक गोष्ट आईला सांगितली, मात्र ती कुठेही बोलण्याची शपथही दिली होती. गौरीच्या आईने याबाबतची माहिती दिली आहे. आज पोलीस गौरीच्या आईचा नव्याने जबाब नोंदवणार आहेत.
Crime News: मुख्यध्यापकाकडून लैंगिक छळ; विद्यार्थिनीने लायब्ररीतच जीवन संपवलंं; सुसाईड नोटमध्ये काय?