प्रवासी हैदराबामध्ये अन् सामान नाशकात... इंडिगो एअरलाइन्सच्या निष्काळजीपणामुळे मनस्ताप

IndiGo Airlines: नाशिकमध्ये प्रवाशांसोबत घडलेल्या एका प्रकारामुळे इंडिगो एअरलाइन्स ही कंपनी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins

प्रांजल कुलकर्णी, नाशिक

IndiGo Airlines: आजवर विमानात वाद होणं, प्रवाशांकडून वारंवार तक्रारी येणे अशा काही घटना कानी पडत होत्या. पण नाशिकमध्ये प्रवाशांसोबत घडलेल्या एका प्रकारामुळे इंडिगो एअरलाइन्स ही कंपनी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. 

एका प्रवाशाने NDTVमराठीला दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (11 जून) नाशिकहून हैदराबादला जाण्यासाठी जवळपास 80 प्रवासी नाशिक एअरपोर्टवर पोहोचलो होतो. दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी विमानाने उड्डाण घेणे अपेक्षित होते.  मात्र विमानाने एक तास उशिराने उड्डाण भरले. साधारणतः  संध्याकाळी 5.15 वाजता आम्ही हैदराबाद विमानतळावर पोहोचल्यानंतर आम्हाला एक विचित्रच अनुभव आला. प्रवासी लगेज बेल्टवर आम्ही सामानाची बराच वेळ वाट पाहत होतो, पण आम्हाला आमचे सामान मिळालेच नाही. 

(नक्की वाचा: बघतोस काय रागाने...! पाहणे-शिवीगाळीवरून चोघांमध्ये झाला वाद व पुढे घडली हादरवणारी घटना)

अखेर आम्ही एअरलाईन्स प्रशासनाला विचारपूस केली असता फ्लाइटमध्ये वजन जास्त झाल्याने तसेच इतर काही कारणास्तव सामान आणण्यात अडचणी आल्या. यामुळे आमचे सामान नाशिकलाच आहे, असे अजबच स्पष्टीकरण कंपनी प्रतिनिधीकडून प्रवाशांना देण्यात आले. तसेच 24 तासाच्या आत सामान उपलब्ध करून देण्याचे प्रवाशांना आश्वासन देण्यात आले.

(नक्की वाचा: आता शालेय पोषण आहारात अंडा-सोयाबीन पुलाव अन् मोड आलेली कडधान्य, 15 नव्या पदार्थांचा समावेश)

अनेक प्रवाशांना हैदराबादवरून पुढे दुसऱ्या ठिकाणी प्रवास करायचा होता. यासोबतच अनेकांची गोळ्या-औषधंही सामानाच्या बॅगमध्येच राहिले होते. त्यामुळे एकंदरीतच इंडिगो प्रशासनाच्या निष्काळजी आणि गलथान कारभारामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकरणी प्रवाशांकडून कारवाईची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. तसेच नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडेही तक्रार नोंदवणार असल्याचं प्रवाशांनी म्हटले.

Advertisement

(नक्की वाचा: महाराष्ट्राचा सातासमुद्रापार डंका! अमरावतीकरांनी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये नोंदवला रेकॉर्ड)

Indigo Airlines | विमान हैद्राबादला, प्रवाशांचं सामान नाशिकलाच; इंडिगो एअरलाईन्सचा गलथान कारभार पाहा

Topics mentioned in this article