Big News : बोगस शालार्थ आयडी आणि शिक्षक भरती घोटाळ्यात मोठी कारवाई, प्रथमच शिक्षण संस्था संचालकाला अटक

शिक्षण संस्था चालकांनीच आरोपी मुख्याध्यापकाच्या खोट्या पात्रता आणि अनुभव दर्शविणाऱ्या बोगस कागदपत्रांवर सही केली होती आणि त्याची थेट मुख्याध्यापकपदी नेमणूक करण्यात आली होती. 

जाहिरात
Read Time: 2 mins

राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी' घोटाळ्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आतापर्यंत या प्रकरणात शिक्षण विभागातील आठहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. बोगस शालार्थ आयडी आणि शिक्षक भरती घोटाळ्यात प्रथमच शिक्षण संस्था संचालकाला अटक करण्यात आली आहे. शिक्षण संस्था चालकांनीच आरोपी मुख्याध्यापकाच्या खोट्या पात्रता आणि अनुभव दर्शविणाऱ्या बोगस कागदपत्रांवर सही केली होती आणि त्याची थेट मुख्याध्यापकपदी नेमणूक करण्यात आली होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आरोपी मुख्याध्यापक पराग पुडके याच्या खोट्या पात्रता आणि अनुभव दर्शविणाऱ्या बोगस कागदपत्रांवर सही करून त्याला थेट मुख्याध्यापक पदी नेमणाऱ्या शिक्षण संस्था अध्यक्षाला भंडारा येथून नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 63 वर्षीय चरण नारायण चेटुले असं अटक झालेल्या शिक्षण संस्था संचालकाचे नाव असून त्याला भंडारा येथून ताब्यात घेण्यात आले आहेत.

Advertisement

नक्की वाचा - Nagpur News : शिक्षक भरती प्रकरणांची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, SIT गठित होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

अटकेनंतर त्याला अस्वस्थ वाटल्याने शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याची आधीच हृदयाची बायपास सर्जरी झालेली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील राजश्री शिक्षण संस्था आणि नवोदय शिक्षण संस्था या दोन संस्थेत तो अध्यक्ष आहे. त्याच्या राजश्री शिक्षण संस्थेच्या विद्यालयात आरोपी पराग पुडके याला पात्रता आणि अनुभव नसताना बोगस कागदपत्रांवरून थेट मुख्याध्यापक नेमण्यात आले होते.

पराग पुडके याच्या अर्जात नागपूर येथील यादवनगर परिसरातील एस के बी प्राथमिक आणि माध्यमिक विद्या मंदिर शाळेची बोगस आणि बनावट कागदपत्रे जोडण्यात आली होती. या कागदपत्रांवर चेटुले याची स्वाक्षरी आहे. पोलिसांनी या घोटाळ्यात शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, मुख्याध्यापक पराग पुडके आणि अन्य पाच जणांना याआधी अटक केली होती. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यावर चरण चेटुले याची या संपूर्ण संदर्भात चौकशी होणार आहे.