जाहिरात

Nagpur News : शिक्षक भरती प्रकरणांची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, SIT गठित होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

Nagpur Teacher Recruitment Scam : चौकशीदरम्यान या अधिकाऱ्यांकडून गंभीर स्वरूपाची माहिती समोर येत असून नागपूरसह राज्याच्या इतर भागातूनही बोगस नियुक्त्या व शालार्थ आयडी घोटाळ्यांबाबत तक्रारी समोर येत आहेत.

Nagpur News : शिक्षक भरती प्रकरणांची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, SIT गठित होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

संजय तिवारी, नागपूर

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील शिक्षण विभागातील बोगस शालार्थ आयडीद्वारे नियुक्त्या, नियमबाह्य मान्यता, अशा गंभीर भरती प्रकरणांची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता, विधान परिषदेचे सदस्य आमदार संदीप जोशी यांनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष तपास पथक (एसआयटी) गठित करण्याची मागणी केली होती. या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी “तपासून कार्यवाही करावी” अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यानुसार शिक्षण विभागातील तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित प्रकरणांची चौकशी सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत करून तातडीने शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्त (महाराष्ट्र राज्य, पुणे) यांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, नागपूर जिल्ह्यात बोगस नियुक्ती प्रकरणाचा मोठा भंडाफोड झाला असून विविध वृत्तपत्रे व टीव्ही चॅनल्सवर यासंदर्भातील बातम्या प्रसिद्ध होत आहेत. 

(नक्की वाचा- Ajit pawar vs Shivsena: "दादा'गिरीमुळे शिंदेसेनेत अस्वस्थता! शिंदे सेनेत उद्रेक होणार?)

याप्रकरणी नागपूर येथील एका पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला असून तपासादरम्यान शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह इतर तीन अधिकारी/कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान या अधिकाऱ्यांकडून गंभीर स्वरूपाची माहिती समोर येत असून नागपूरसह राज्याच्या इतर भागातूनही बोगस नियुक्त्या व शालार्थ आयडी घोटाळ्यांबाबत तक्रारी समोर येत आहेत.

(नक्की वाचा- Pahalgam attack: पाकिस्तानची टरकली! 'फतह' या क्षेपणास्त्राची केली चाचणी, 3 दिवसात 2 चाचण्या)

या प्रकरणातील शाळा चालक व शिक्षण विभागातील काही अधिकारी/कर्मचाऱ्यांनी शिक्षण क्षेत्राला भ्रष्टाचाराचे कुरण बनवून शासन, शिक्षक व पालकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न होत आहे. शिक्षण विभागातील हा घोटाळा नागपूर विभागात मर्यादित नसून त्याची व्याप्ती संपूर्ण राज्यभर आहे.

ही बाब लक्षात आणून देत प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची आग्रही मागणी आमदार संदीप जोशी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. याच मागणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू झाली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: