Eknath Khadse: रेव्ह पार्टीत जावई सापडले! एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले...

जर ती खरचं रेव्ह पार्टी असेल आणि माझे जावई जर त्या पार्टीमध्ये गुन्हेगार असतील तर मी त्यांचे समर्थन करणार नाही," असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, जळगाव:

Eknath Khadse On Pune Rave Party: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पुण्यातील खराडी परिसरात एका फ्लॅटमध्ये पोलिसांनी या रेव्ह पार्टीवर धाड टाकली. या पार्टीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांनाही अटक झाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणालेत एकनाथ खडसे?

"या वातावरणानुसार असं काही घडू शकतं याचा अंदाज मला थोडा थोडा येत होता. असं होऊ शकतं. मी फारसे त्यावर बोलणार नाही. अलिकडे ज्या काही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे त्या मी तुमच्याच माध्यमातून पाहत आहे. माझे त्यांच्याशी प्रत्यक्षात बोलणे झाले नाही. मात्र जर ती खरचं रेव्ह पार्टी असेल आणि माझे जावई जर त्या पार्टीमध्ये गुन्हेगार असतील तर मी त्यांचे समर्थन करणार नाही," असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

Pune Rave Party Raid: टीप मिळताच धाड! 7 जण नशेत धुंद, नाथाभाऊंचे जावई रेव्ह पार्टी प्रकरणात कसे अडकले?

तसेच "या प्रकरणात फॉरेन्सिक रिपोर्ट, ब्लड रिपोर्ट आले पाहिजेत. मात्र सध्या वृतवाहिन्यांवर ज्या चर्चा सुरु आहेत ज्यानुसार हे कसं घडवलं जात आहे हे पाहिलं पाहिजे. याबाबत तथ्य समोर येईल. माझा जावई दोषी असेल तर तथ्य असेल कारवाई होईल. त्यानंतरही मी पत्रकार परिषद घेईन," असं एकनाथ खडसे म्हणालेत. 

रोहित पवार यांचीही टीका

"पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणात पोलीस तपास आणि न्याय वैद्यकीय चाचणीत सत्य समोर येईलच, परंतु #हनी_ट्रॅप प्रकरणात सरकारला अडचणीत आणणाऱ्या मा. खडसे साहेबांच्या कुटुंबाच्या बाबतीत राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी तर केलं जात नाही ना, हेही बघितलं पाहिजे. कुणी दोषी असेल तर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, परंतु हे राजकीय षडयंत्र असेल तर मात्र हे अत्यंत चुकीचं आणि राजकारणाचा स्तर खालच्या पातळीवर गेल्याचं लक्षण आहे," अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. 

Pranjal Khewalkar : पुण्यातील रेव्ह पार्टीचा पहिला Video; प्रांजल खेवलकर उभे अन् समोर टेबलावर...