
Pune rave Party : पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीमधून एकनाख खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर (who is Pranjal Khewalkar) यांना अटक करण्यात आली आहे. या पार्टीतून पाच पुरुष आणि दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ज्या खोलीत रेव्ह पार्टी सुरू होती, ती हॉटेलची खोली प्रांजल यांच्या नावावर असल्याचं समोर आलं आहे. रेव्ह पार्टीतील (Pune Rave Party) सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या रेव्ह पार्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या पार्टीमध्ये दोन मुली आणि पाच पुरुषांचा समावेश आहे.
या पार्टीमध्ये मद्यपान, हुक्का घेतला जात होता. याशिवाय यामध्ये गांजाची पाकिटंही दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये छापेमारीनंतर त्यातील एक मुलगी रडतानाही दिसत आहे. हाऊस पार्टीच्या नावाखाली इथं रेव्ह पार्टी सुरू असल्याचं समोर आलं आहे.
प्रांजल खेवलकर यांच्या नावाने बुकिंग
हॉटेल बुकिंगच्या पावत्या समोर आल्या आहेत. 25 ते 28 जुलैपर्यंत या हॉटेलचं बुकिंग करण्यात आलं होतं. रूम नंबर 101 आणि रूम नंबर 102 खेवलकर यांच्या नावाने बुक केल्या होत्या. याचं भाडं 10 हजार 357 रुपये इतकं होतं. एका रुमचं बुकिंग 25 ते 28 जुलैदरम्यान तर दुसऱ्या रूमचं बुकिंग 26 ते 27 जुलै दरम्यान करण्यात आलं होतं.
नक्की वाचा - रिअल इस्टेटचा व्यवसाय, स्वत:ची ट्रॅव्हल कंपनी; पुण्यात रेव्ह पार्टीत सापडलेले एकनाथ खडसेंचे जावई कोण आहेत?
खराडी येथील रुममध्ये धाड मारल्यानंतर प्रांजल केवलकर यांच्या घरावर देखील पुणे पोलिसांची छापेमारी केली. त्यांच्या घरात केलेल्या छापेमारीत लॅपटॉप आणि हार्ड डिस्क पुणे पोलिसांनी जप्त केले आहे. हडपसर येथील प्रांजलच्या घरावर पोलिसांची छापेमारी केली आहे.
गुंडाच्या भावाचा रेव्ह पार्टीत समावेश
पुण्यातील खराडी परिसरात झालेल्या रेव्हपार्टीमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवरकर यांच्यासोबत पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित गुंड बॉबी यादव याच्या भावाचा देखील समावेश आहे. 'श्रीपाद यादव' याच्यावर पिंपरी- चिंचवडमध्ये बेटिंगचा गुन्हा दाखल आहे. इतर वेळी तो दुबई, अशा ठिकाणी असायचा. पुण्यातील अनेक पबमध्ये तो दिसून येतो. श्रीपाद हा 'बॉबी यादव' चा भाऊ आहे. बॉबी यादवची टोळी आहे. परंतु श्रीपाद हा या टोळीचा भाग नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world