
Pune Rave Party News: पुण्यामध्ये रेव्ह पार्टीवर धाड टाकण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. पुण्यातील उच्चभ्रू सोसायटी असलेल्या खराडी भागामध्ये ही धाड टाकण्यात आली असून यामध्ये एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर याचाही समावेश होता. पोलिसांनी धाड टाकून 3 महिला आणि 2 पुरुषांना अटक केली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
पुणे शहरातील खराडी भागामध्ये एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरु असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. या माहितेच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली असून रेव्ह पार्टी करणाऱ्या तीन महिला आणि दोन पुरुषांना ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये अंमली पदार्थ,हुक्का, दारु, जप्त करण्यात आली आहेत. धक्कादायक म्हणजे यामध्ये एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर याचा देखील समावेश असल्याचे उघडकीस आले आहे.
Pune rave party : आताची मोठी बातमी! पुण्यातील रेव्ह पार्टीतून एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक
या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर मद्यपदार्थांचे सेवन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे संबंधित रुमही एकनाथ खडसे यांचे जावई पांजल खेवलकर यांच्या जावयाच्याच नावावर बूक केली गेल्याचेही उघड झाले आहे. एकीकडे एकनाथ खडसे यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात हनी ट्रॅप प्रकरणात आवाज उठवला असतानाच झालेल्या या कारवाईने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत. एकनाथ खडसे हे सरकारविरोधात आवाज उठवत आहेत, त्याची किंमत त्यांचे कुटुंबीय मोजत आहे, अशी गंभीर टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. तसेच एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरवर आज झालेली कारवाई म्हणजे स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करत बोलणाऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. खडसे आणि खडसेंसारख्या बोलणाऱ्या अनेक लोकांच्यासाठी हा एक संदेश आहे, "चुप् बैठो नही तो रेड करुंगा..." असं सांगण्याचा प्रयत्न असल्याचा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला आहे.
दरम्यान, या रेव्ह पार्टीमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवरकर यांच्यासोबत पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित गुंड बॉबी यादव याच्या भावाचा देखील समावेश आहे. 'श्रीपाद यादव' याच्यावर पिंपरी- चिंचवडमध्ये एक बेटिंग चा गुन्हा दाखल आहे. इतर वेळी तो दुबई, अशा ठिकाणी असायचा, पुण्यात ही अनेक पब मध्ये दिसतो. श्रीपाद, हा 'बॉबी यादव' चा भाऊ आहे, बॉबी यादव ची टोळी आहे. परंतु श्रीपाद हा या टोळीचा भाग नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world