महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात एक खास 'एकता खिचडी' महोत्सव घडवून आणला आणि संपूर्ण तुरुंग परिसर खमंग घमघमाटाने दरवळून गेला. "तुम्ही कधीतरी तुरुंगातील लोकांसाठी खायचे काही खमंग करा," एका माजी कैद्याच्या या वाक्याने विष्णू मनोहर यांना एकता खिचडीची कल्पना सुचली. 30 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या उत्सवात सुमारे 3000 कैद्यांनी एकत्र येत खिचडीचा आस्वाद घेतला.
नक्की वाचा: सचिन पिळगावकरांचा आणखी एक दावा, ट्रोलर्स म्हणतायत सोडियम लेव्हल चेक करा
3 तास 30 मिनिटांत 3,000 कैद्यांसाठी खिचडी तयार
30 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता खिचडी बनविण्यास सुरूवात झाली. 3 तास 30 मिनिटांत खिचडी बनून तयार झाली. खिचडी बनविण्याच्या प्रक्रियेत सगळे कैदी सहभागी झाले होते. भाजी कापणे, डाळ-तांदूळ धुणे आणि खिचडी बनविणे यामध्ये कैद्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. ही खिचडी बनविण्यासाठी 10 बाय 10 फुटांची कढईचा वापरण्यात आली होती. खिचडी अत्यंत दर्जेदार आणि पौष्टिक साहित्याचा वापर करून तयार करण्यात आली होती. ही 'एकता खिचडी' शासन अधिसूचना दिनांक 28 मे 2006 नुसार ठरविण्यात आलेल्या आहार मापदंडानुसार (Diet Scale) तयार करण्यात आली होती.
नक्की वाचा: मुंबईत फिरतेय 'बडी दीदी'; अल्पवयीन मुली टार्गेटवर
कैद्याच्या मेसेजमुळे 'खिचडी' शिजली
एका माजी कैद्याने तुरुंगातील कैद्यांना स्वादीष्ट खिचडी मिळावी असे मत मांडले होते. विष्णू मनोहर यांना ही कल्पना आवडल्याने त्यांनी यासाठी पुढाकार घेण्याचे मान्य केले होते. तुरुंग प्रशासनाने त्याला मान्यता दिली ज्यामुळे ही खिचडी शिजू शकली. यापूर्वी विष्णू मनोहर यांनी कैद्यांसाठी फास्ट फूड प्रशिक्षण कार्यक्रमही घेतला होता, ज्यामुळे कारागृहातून सुटलेल्या अनेक कैद्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.