महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार (Ajit Pawar NCP advertisement) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) नवीन टीव्ही जाहीरात ‘आता घड्याळाचे बटन दाबणार, सर्वांना सांगणार' यावर महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक कार्यालयाने आक्षेप नोंदवला आहे. राज्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जाहिरातीतील काही संदर्भांवर आक्षेप घेतला असून जाहिरातीच्या मंजुरीसाठी ठराविक भाग काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राष्ट्रवादीने राज्यस्तरीय प्रमाणिकरन समितीसमोर निवडणूक प्रचारासाठी आपल्या टीव्ही जाहिरातीच्या पूर्व-प्रमाणिकरणासाठी अर्ज केला होता. राज्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्हिडिओ जाहिरातीमध्ये दिलेल्या काही भागावर आक्षेप घेतला आहे.
नक्की वाचा - ठाण्यात उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांशी बोलत असताना घडला धक्कादायक प्रकार; सुदैवाने दुखापत टळली!
अजित पवार गटाच्या जाहिरातीमध्ये, एक पत्नी आपल्या पतीला विनोदाने म्हणते, “आता तुम्हीही राष्ट्रवादीला मत द्या नाहीतर आज रात्री मी तुम्हाला खायला देणार नाही." एखाद्या विशिष्ट पक्षाला मतदान न केल्यामुळे कुणीही कुणाला अन्न नाकारू शकत नाही, असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. पोल बॉडीने जाहिरातीतील संभाषण "पत्नीकडून नवऱ्याला दिलेली धमकी" असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे आणि पक्षाला जाहिरात प्रसारीत करण्यासाठी हा भाग काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.