Election Commission: निवडणुकीचे फोटो, व्हिडिओ 45 दिवसात नष्ट करा.. केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्यांना निर्देश

नियम बदलांवरुन काँग्रेसच्या महराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याने वेगळीच शंका उपस्थित केली होती, अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) मतदान प्रक्रियेच्या संबंधित व्हिडीओ फुटेज आणि फोटोंबाबत सर्वात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक प्रक्रिया संपन्न झाल्याच्या 45 दिवसांनंतर सर्व सीसीटीव्ही, वेबकास्टिंग व व्हिडीओ फुटेज नष्ट करण्याचे निर्देश केंद्रीय आयोगाने राज्य निवडणूक आयोगांना दिले आहेत.

Uddhav Thackeray: ठाकरे गटाची डिनर डिप्लोमसी! मनसेच्या युतीबाबत बैठकीत मोठा निर्णय

 समोर आलेल्या माहितीनुसार,निवडणूक प्रक्रिया संपन्न झाल्याच्या 45 दिवसांनंतर सर्व सीसीटीव्ही, वेबकास्टिंग व व्हिडीओ फुटेज नष्ट करण्याचे निर्देश आयोगाने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले, नियम बदलांवरुन काँग्रेसच्या महराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याने वेगळीच शंका उपस्थित केली होती, अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

आमच्या व्हिडीओ फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरविली जात असल्याची शंका केंद्रीय निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे. या फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या भीतीने आयोगाने आपल्या नियमात बदल केले आहेत. निवडणूक प्रक्रिया संपन्न झाल्याच्या 45 दिवसांनंतर सर्व सीसीटीव्ही, वेबकास्टिंग व व्हिडीओ फुटेज नष्ट करण्याचे निर्देश आयोगाने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मात्र, या कालावधीत निवडणूक निकालाला कोणी न्यायालयात आव्हान दिले तर हे फुटेज अधिकाऱ्यांना नष्ट करता येणार नसल्याचे संबंधित निर्देश देताना आयोगाने स्पष्ट केले. या नियम बदलांवरुन काँग्रेसच्या महराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याने वेगळीच शंका उपस्थित केली आहे. दरम्यान, या निर्णयानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सरकारवर निशाणा साधला आहे. 

Maharashtra Politics: खासगी सचिवांचे लाड बंद! CM फडणीवासांकडून संमती नाही, शिवसेना मंत्र्यांना इशारा?

मतदान प्रक्रियेत काही घोटाळा केलेला नाही तर नियम बदलण्याची घाई कशासाठी केली. यावरून दाल में कुछ काला है हे स्पष्ट दिसते. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र व हरियाणाप्रमाणेच इतर राज्यातही मतांवर दरोडा टाकला आहे. काँग्रेस पक्ष ही लढाई सुरुच ठेवली असून सर्वोच्च न्यायलयात दाद मागणार आहोत असेही नाना पटोले म्हणालेत. 

Advertisement