जाहिरात

Maharashtra Politics: खासगी सचिवांचे लाड बंद! CM फडणीवासांकडून संमती नाही, शिवसेना मंत्र्यांना इशारा?

मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप हिरवा कंदील मिळाला नाही अशा सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ त्यांच्या मूळ खात्यात रुजू होण्याचे आदेश दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

Maharashtra Politics: खासगी सचिवांचे लाड बंद! CM फडणीवासांकडून संमती नाही, शिवसेना मंत्र्यांना इशारा?

मुंबई: खाजगी सचिव नियुक्तीवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली असून शिवसेनेच्या मंत्र्यांना सूचक इशारा दिला आहे. ज्या खाजगी सचिवांच्या नावाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप हिरवा कंदील मिळाला नाही अशा सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ त्यांच्या मूळ खात्यात रुजू होण्याचे आदेश दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

Uddhav Thackeray: ठाकरे गटाची डिनर डिप्लोमसी! मनसेच्या युतीबाबत बैठकीत मोठा निर्णय

काय आहे नेमके प्रकरण?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खाजगी व सचिव नियुक्तीच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतल्याचा दिसून येत आहे. काही कॅबिनेट मंत्र्यांनी काही विशिष्ट खाजगी सचिव असावे असा आग्रह धरला होता, मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यास नकार देत नव्या खाजगी सचिव नियुक्त नावाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यात बहुतेक  मंत्री शिवसेनेचे आहेत. शिवसेनेमधील वादग्रस्त कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्यासह उदय सामंत शंभूराजे देसाई भरत गोगावले गुलाबराव पाटील या कॅबिनेट मंत्र्यांनी खादी सचिव नियुक्तीसाठी काही नाव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली होती. 

 मात्र मुख्यमंत्री कार्यालयाने खाजगी सचिवांच्या नावाला अद्यापही हिरवा कंदील दिला नाही, यामुळे या कॅबिनेट मंत्र्यांना खाजगी सचिव अद्यापही नियुक्त करण्यात आले नाही. शिवसेनेच्या या कॅबिनेट मंत्र्यांनी काही विशिष्ट नावेच खाजगी सचिवासाठी आग्रही धरली होती. मात्र मुख्यमंत्री कार्याकडून त्या नावांना विरोध असल्याने अद्यापही मंत्र्यांना खाजगी सचिव देण्यात आले नाही. अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट मंत्र्यांना ज्यांनी खाजगी सचिव अद्याप नियुक्त केले नाही अशांना नव्या खाजगी सचिव नियुक्तीचे प्रस्ताव सादर करण्याचे सूचना केल्याची माहिती सूत्राने दिली आहे.

 एनडीटीव्ही मराठीने वादग्रस्त विशाल राठोड यांनी खाजगी सचिव नियुक्त झालेली नसताना देखील परस्पर मंत्री कार्यालय पत्रांवर सह्या केल्या आणि अनेक वेगवेगळे निर्णय घेतले यावरून वृत्त दिले होते. या बातमीची दखल घेत आता खाजगी सचिव नियुक्तीच्या बाबत जे वादग्रस्त अधिकारी आहेत त्यांची नियुक्ती न करण्याची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याची माहिती मिळाली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - DOOMSDAY FISH: एका माशामुळे जगाचं टेन्शन वाढलं, जगाची वाटचाल अंताकडे सुरू? काय आहे प्रकार?

जवळपास सहा महिने अनेक खाजगी सचिव नियुक्ती व्हावी म्हणून त्यांच्या मूळ खात्यामध्ये रजेवर आहेत तर अन्य काही कारण देऊन सुट्टीवर गेले आहेत. मात्र यामुळे मूळ विभागातील वरिष्ठ अधिकारी देखील नाराज आहेत, मुख्यमंत्री कार्यालयाने ज्यांची नावे खाजगी सचिव म्हणून आता नियुक्त होणार नाहीत. अशा अधिकाऱ्यांना त्यांचे मूळ विभागात रुजू होण्याचे आदेश देखील दिले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

 काही अधिकारी खाजगी सचिव असल्याचे भूमिका घेत पत्र फाईल यावर स्वाक्षऱ्या परस्पर केल्या आहेत, याची देखील खातेनिहाय चौकशी होण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे. जे अधिकारी खाजगी सचिव नियुक्ती झाले नाही तरी देखील मूळ विभागात अद्यापही रुजू झाले नाहीत अशा अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्याची शक्यता देखील असल्याची माहिती सूत्राने दिली आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com