Elphinstone Bridge : परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिन्स्टन पूल आज रात्रीपासून बंद, पर्यायी मार्ग कोणते?

वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी काही पर्यायी मार्ग देखील वाहतूक पोलीस आणि महापालिकेतर्फे देण्यात आले आहेत.  

जाहिरात
Read Time: 2 mins

Elphinstone Bridge demolition : परळ आणि प्रभादेवीला जोडणारा 125 वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल आज रात्री नऊ वाजल्यापासून बंद करण्यात येणार आहे. वरळी शिवडी एलिव्हेटेड मार्गासाठी हा पूल बंद करण्यात येणार असून नवीन डबल डेकर पूल एमएमआरडीएकडून उभारण्यात येणार असल्याची माहिती महापालिका तर्फे देण्यात आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ))

मात्र हा पूल बंद होणार असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार असल्याने नागरिकांनी तसेच वाहन चालकांनी मोठा विरोध देखील केला होता. त्यानुसार महापालिकेने नागरिकांकडून काही हरकती मागवल्या होत्या. नागरिकांनी दिलेल्या हरकतीनुसार वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी काही पर्यायी मार्ग देखील वाहतूक पोलीस आणि महापालिकेतर्फे देण्यात आले आहेत.  

नक्की वाचा - Vidyavihar ROB : 10 वर्षांची प्रतीक्षा, विद्याविहार पूल एप्रिल 2026 मध्ये पूर्ण होणार; मुंबईकरांना कसा होईल फायदा? 

पर्यायी मार्ग कोणते?


दादर पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि दादर मार्केटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना टिळक पुलाचा वापर करता येईल. परळ पूर्वेकडून प्रभादेवी आणि लोअर परळकडे जाणारी वाहनं करी रोडच्या पुलाचा वापर करू शकतात. 

Advertisement

परळ, भायखळा पूर्वेकडून प्रभादेवी, वरळी, कोस्टल कोड आणि सी-लिंकच्या दिशेने जाणारी वाहनं चिंचपोकळी पुलाचा वापर करू शकतील. 

प्रभादेवी आणि लोअर परेल पश्चिमेकडून परळला, टाटा रुग्णालय आणि केईएम रुग्णालयाला जाणाऱ्या वाहनांना दुपारी ३ ते रात्री ११ या कालावधीत करी रोड पुलाचा वापर करता येणार आहे.