जाहिरात

Vidyavihar ROB : 10 वर्षांची प्रतीक्षा, विद्याविहार पूल एप्रिल 2026 मध्ये पूर्ण होणार; मुंबईकरांना कसा होईल फायदा?  

Vidyavihar ROB : विद्याविहार पुलासाठी वापरण्यात आलेला 650 मीटर लांब गर्डर मुंबईतील सर्वात लांब गर्डरपैकी एक आहे. प्रत्येक गर्डरचे वजन सुमारे 1100 मेट्रिक टन आहे.

Vidyavihar ROB : 10 वर्षांची प्रतीक्षा, विद्याविहार पूल एप्रिल 2026 मध्ये पूर्ण होणार; मुंबईकरांना कसा होईल फायदा?  

Mumbai News : मध्य रेल्वेवरील विद्याविहार स्टेशनवरी रोड ओव्हर ब्रिज पुढच्या वर्षी एप्रिल 2026 मध्ये पूर्ण होण्याचं नियोजन आहे. एलबीएस मार्ग आणि रामकृष्ण चेंबूरकर मार्गाशी जोडणार हा पूल असणार आहे. तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा पूल लोकांच्यासाठी खुला होईल. पुलाचे काम 2016 मध्ये सुरू झाले होते. परंतु त्यानंतर पावसाळी पाण्याच्या गटारांचे काम, अतिक्रमणे हटवणे आणि कोरोनामुळे पुलाच्या उभारणीला उशीर झाला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ))

1991 च्या विकास आराखड्यात या पुलाचा प्रस्ताव पहिल्यांदा देण्यात आला होता. 2016 पर्यंत हा प्रस्ताव कागदावरच होता. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने 2018 मध्ये कामाची मंजुरी दिली. बांधकाम काही महिन्यांनंतर सुरू झाले. मात्र कोरोनामुळे त्याचा काम पुन्हा थांबले होते. हिंदुस्थान टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसारित केलं आहे. 

(नक्की वाचा-  NDTV Marathi Manch: मुंबई मेट्रोचे काम कधी पूर्ण होणार? अश्विनी भिडेंनी सर्वच सांगितलं)

पूर्व उपनगरातील वाहनचालकांना रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी घाटकोपर किंवा कुर्ला मार्गे वळसा जावं लागतं. विक्रोळी, भांडुप आणि घाटकोपर येथे बांधकाम सुरू असलेले आरओबी पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही. तर विद्याविहार पूल डिसेंबर 2024 मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र आता ही मुदत एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

ट्रेंडिंग बातमी - NDTV Marathi Manch: पायाभूत सुविधा, दळणवळ, पर्यटन यावर सरकारचा भर, शिंदेंनी रोडमॅप सांगितला

विद्याविहार पुलासाठी वापरण्यात आलेला 650 मीटर लांब गर्डर मुंबईतील सर्वात लांब गर्डरपैकी एक आहे. प्रत्येक गर्डरचे वजन सुमारे 1100 मेट्रिक टन आहे. पहिला गर्डर मे 2023 मध्ये आणि दुसरा नोव्हेंबर 2023 मध्ये बसवण्यात आला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: