Pandharpur : पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त चिकन मसाल्याची भेट, वारकऱ्यांमध्ये संताप

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बीव्हीजी कंपनीकडून चिकन मसाला भेट देण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Chicken Masala Diwali gift : दिवाळी हा हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्त्वपूर्ण सण आहे. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने नातेवाईकांना गिफ्ट देतो, घरात फराळ तयार केला जातो. कंपन्यांमध्येही या दिवसात कर्मचाऱ्यांचा आनंद वाढविण्यासाठी दिवाळी गिफ्ट दिलं जातं. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल होत आहे.

काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ट्रॉली बॅग, कॉफी मशीन, चांदीचं नाणं तर काही कर्मचाऱ्यांना एअर फ्रायर मिळालं आहे. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान पंढरपुरातील विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट म्हणून चिकन मसाला दिल्याने एकच संताप व्यक्त केला जात आहे. 

नक्की वाचा - Diwali Office Gift :अस्सं गिफ्ट दिलं की कर्मचाऱ्यांचा चेहरा खुलला; आतापर्यंतचे 5 सर्वात भारी ऑफिस दिवाळी गिफ्ट

विठ्ठल भक्त वारकरी संप्रदायात शाकाहार हा सर्वश्रेष्ठ आहार मानला जातो. मांसाहार, मद्यपान अशा गोष्टींना वारकरी संप्रदाय विठ्ठल भक्तांमध्ये जागा नाही. अशातच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बीव्हीजी कंपनीकडून चिकन मसाला भेट देण्यात आली आहे. विठ्ठल मंदिरामध्ये बीव्हीजी कंपनीकडून आउट सोर्सिंग पद्धतीने सुरक्षारक्षक आणि इतर कर्मचारी पुरवले जातात. याच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चिकन मसाला देण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सध्या वारकरी संप्रदायातून चिकन मसाल्याच्या भेटवस्तूबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

Advertisement