जाहिरात

Diwali Office Gift :अस्सं गिफ्ट दिलं की कर्मचाऱ्यांचा चेहरा खुलला; आतापर्यंतचे 5 सर्वात भारी ऑफिस दिवाळी गिफ्ट

सध्या सोशल मीडियावर कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या गिफ्टचे व्हिडीओ कर्मचाऱ्यांकडून पोस्ट केले जात असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय.

Diwali Office Gift :अस्सं गिफ्ट दिलं की कर्मचाऱ्यांचा चेहरा खुलला; आतापर्यंतचे 5 सर्वात भारी ऑफिस दिवाळी गिफ्ट

Office Diwali Gift for Employees : सध्या सोशल मीडियावर कंपन्यांकडून दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना दिल्या (Diwali 2025) जाणाऱ्या गिफ्टची मोठी चर्चा आहे. यासंदर्भातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका कंपनीच्या ऑफिसातील दिवाळी गिफ्टचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याच्या डेस्कवर एक ट्रॉली बॅग आणि गिफ्टची बॅग ठेवण्यात आली होती. कर्मचारी येण्यापूर्वीच त्यांचे डेस्क सजवण्यात आले होते. कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंददायी करण्यासाठी कंपनीची तयारी पाहून अनेकांना मोठा हेवा वाटला. यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी ऑफिसमधील दिवाळी गिफ्टचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. (Viral Video on Social Media)

अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कॉफी मशीन आणि एअर फ्रायर दिलं आहे. या संदर्भातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

महिंद्रा कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी सुंदर असा बॉक्स दिला असून त्यात विविध पॅकेट्समध्ये मिठाई आणि ड्रायफ्रूट्स, फराळ, चॉकलेट्स आहेत. याशिवाय दिवाळीच्या सजावटीचे सामानही आहे.

एका टेक कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना फिलिप्सचं एअर फ्रायर, २ हजार रुपयांचं Gift Wavchar, चॉकलेट आणि सिल्वर नाणं दिलं आहे. गिफ्ट पाहून कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

या कंपनीने कर्मचाऱ्यांना कॅमरॉनचं पॉवर बँक दिलंय, त्याशिवाय एअर पॉड, मिठाई, जिम बॅग देण्यात आली आहे.

Razorpay नावाच्या कंपनीने कर्मचाऱ्यांना बोट कंपनीचा स्पीकर दिला आहे. याशिवाय नमकीन, मिठाई, चॉकलेट याशिवाय उनो दिला आहे. याशिवाय ऑफरचं एक बुकलेटही दिलं आहे.

Kohler या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना अत्यंत सुंदर गिफ्ट दिलं आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना कॉफी मशीन, एअर फ्रायर दिलं आहे. याशिवाय ड्रायफ्रूट्स मिठाई, चॉकलेट्स दिले आहे. २० ग्रॅमचं चांदीचं नाणं, काजू-बदाम, दिवाळी सजावटीची माळ, दिवे गिफ्ट म्हणून दिले आहेत. 

सध्या सोशल मीडियावर कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या गिफ्टचे व्हिडीओ कर्मचाऱ्यांकडून पोस्ट केले जात असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. हे व्हिडीओ पाहात असताना काही कर्मचारी मिळालेल्या गिफ्टमुळे आनंदी झालेत तर काही कर्मचारी मनासारखं गिफ्ट न मिळाल्याने निराश झालेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com