Maharashtra Rain News : मागील काही दिवसांपासून राज्यभरात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. परंतु,आता मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. उद्या म्हणजेच 21 जुलै रोजी ठाणे, मुंबई, पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 21 आणि 22 जुलै रोजी मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला येलो अलर्ट
या काळात वाऱ्याचा वेगही प्रचंड असण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्याला 24 तारखेपर्यंत येलो अलर्ट देण्यात आला आहे. इथे बहुतांश भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला 23 जुलै रोजी येलो अलर्ट देण्यात आला आहे.