Maharashtra Rain News : मागील काही दिवसांपासून राज्यभरात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. परंतु,आता मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. उद्या म्हणजेच 21 जुलै रोजी ठाणे, मुंबई, पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 21 आणि 22 जुलै रोजी मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला येलो अलर्ट
या काळात वाऱ्याचा वेगही प्रचंड असण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्याला 24 तारखेपर्यंत येलो अलर्ट देण्यात आला आहे. इथे बहुतांश भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला 23 जुलै रोजी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
🚨 Just in: IMD has issued Orange Alert for Mumbai, Thane & Raigad for tomorrow (21 July) amid heavy to very heavy rains 🟠#MumbaiRains pic.twitter.com/UlcAhsqQVn
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) July 20, 2026
नक्की वाचा >> Pune News : पुण्यात कुठे मिळतं फक्त 10 रुपयात इडली सांबार, तुम्हाला माहितेय का?
मुंबईसाठी पुढील तीन तास धोक्याचे
सध्याच्या ताज्या माहितीनुसार, पुढील 3 तासात मुंबई शहर,मुंबई उपनगर,पालघर,ठाणे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
🚨 Mumbai Police have imposed citywide prohibitory orders barring public gatherings of five or more people from July 23 to August 6. pic.twitter.com/cfZQ9qRaSW
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) July 20, 2026
तरी नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे,असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world