'ज्या काँग्रेस आमदारांची मते फुटली त्यांची हाकलपट्टी करा'

या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीत कुरबुर सुरू झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली आहे. 11 पैकी  9 जागा जिंकण्यात यश मिळवलं आहे. तर महाविकास आघाडीला 2 जागांवर समाधान मानावे लागले. आघाडीचे जयंत पाटील यांना पराभव स्विकारावा लागला. या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीत कुरबुर सुरू झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जे आमदार फुटले आहेत त्यांची काँग्रेसने हाकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे काँग्रेस याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काँग्रेसचे आमदार विधान परिषद निवडणुकीत फुटल्याची जोरदार चर्चा आहे. महाविकास आघाडीकडे असलेली मते आणि त्यांना मिळालेली मते याचा ताळमेळ पाहाता आघाडीची मते फुटली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही मिलींद नार्वेकर यांनी विजय मिळवला. पण त्यांनाही दुसऱ्या पसंतीच्या मतांची वाट पाहावी लागली. त्यांना पहिल्या फेरीत विजय मिळवता आला नाही. काँग्रेसकडे असलेली अतिरिक्त मते पाहाता. नार्वेकरांना पहिल्या पसंतीची मते मिळणे गरजेचे होते. पण तसे झाले नाही. त्यामुळे काँग्रेसची मते फुटल्याची जोरदार चर्चा आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Vidhan Parishad Election result Live Update : 'शरद पवारांना अजित पवारांचं एकही मत फोडता आलं नाही'

ही बाब काँग्रेसने गांभिर्याने घ्यावी असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. जे फुटले. ज्यांनी पक्षा बरोबर गद्दारी केली, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. त्यांची पक्षातून हाकालपट्टी करा अशी मागणीच जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. असे असले तरी याचा विधानसभा निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही असेही ते म्हणाले. मात्र फुटलेले आमदार कोण याचा शोध आता काँग्रेसला घ्यावा लागणार आहे. काही मते इकडे तिकडे झाल्याचे काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाबासाहेब थोरात यांनी सांगितले.  


 

Advertisement