Nanavati Hospital : मुंबईतील नामांकित रुग्णालयात बोगस डॉक्टरकडून उपचार, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

आज या बोगस डॉक्टरला शिवडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

Nanavati Hospital Bogus Hospital : नानावटीसारख्या प्रसिद्ध रुग्णालयात बोगस डॉक्टर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.  सर्वसाधारणपणे झोपडपट्टी भागातून आतापर्यंत अनेक बोगस डॉक्टरांना रंगेहात पकडण्यात आलं आहे. कोणतीही अधिकृत शिक्षण नसताना ही मंडळी रुग्णांवर उपचार करतात. आता तर मुंबईतील नामांकित  नानावटी रुग्णालयात रुग्णसेवा देणाऱ्या बोगस डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, अतुल वानखेडे असं या डॉक्टरचं नाव आहे.  तो नानावटी रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करीत असल्याचं समोर आलं आहे. आज त्याला शिवडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याने 2011 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ सेशल्स विद्यापीठाची पदवी घेतल्याचं प्रमाणपत्र त्याच्याजवळ आहे. ही पदवी त्याने पुण्यातील केईएम रुग्णालयातून घेतल्याचा दावा केला आहे. 

नक्की वाचा - MHADA : म्हाडाच्या घरांच्या किमतीचा वाद उच्च न्यायालयात, ग्राहकांची मोठी मागणी; काय आहे प्रकरण?

परंतु संबंधित विद्यापीठ 2010 मध्येच बंद झाल्याचे उघड झाले आहे. अतुल वानखेडे नानावटी रुग्णालयात ऑर्थोपेडिक म्हणून रुग्णांवर उपचार करत होता. नानावटी रुग्णालयात बोगस डॉक्टर आढळल्याने वैद्यकीय क्षेत्रातून चिंता व्यक्त केली जात आहे. 

Advertisement