
उमर सय्यद, अहमदनगर
अहमदनगर बोगस सैन्य भरतीचे मोठे रॅकेट उघडकीस आलं आहे. मिलिटरी इंटेलिजन्स (MI) पुणे आणि नगरच्या भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनने मोठी करवाई केली आहे. याप्रकरणी बोगस आर्मी मेजर सत्यजीत कांबळेला श्रीरामपूरच्या बेलापूरमध्ये अटक करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी आणखी तपास करत आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, सत्यजित कांबळे हा आपल्या साथीदारासोबत आम्ही मेजर पदावर सैन्यात नोकरीवर आहोत, असे भासवून लोकांची फसवणूक करत होता. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा आणि नवी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये भरतीचे रॅकेट चालवत होता.
(नक्की वाचा - पूरग्रस्तभागात काँग्रेस खासदाराची स्टंटबाजी, व्हिडीओ तुफान व्हायरल)
सत्यजित कांबळेने आर्मीमध्ये नोकरीला लावून देतो असे सांगत अनेकांची फसवणूक केली होती. तसेच महाराष्ट्रसह इतर राज्यातील तरुणांना भरती ट्रेनिंगला बोलावून त्यांच्याकडून वारंवार रक्कम घेण्यात घेऊन फसवणूक करण्यात आली होती. त्याने डेहराडून, उत्तराखंड आणि महाराष्ट्रातील श्रीगोंदा येथे बनावट प्रशिक्षण शिबिरे उभारली होती.
(नक्की वाचा- पूरग्रस्तभागात काँग्रेस खासदाराची स्टंटबाजी, व्हिडीओ तुफान व्हायरल)
आरोपी इच्छुक उमेदवारांकडून प्रत्येकी 7 ते 8 लाख रुपये फी घेत होता. याद्वारे त्याने सुमारे 3-4 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान आरोपी हा जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे आला असल्याची माहिती मिळताच भिंगार कॅप पोलीस आणि मिलिटरी इंटेलिजन्स पुणे यांनी आरोपी सत्यजित कांबळे याला बेड्या ठोकल्या आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world