FASTag Annual Pass : 15 ऑगस्टपासून वाहनचालकांसाठी टोल भरण्याचा त्रास आता कमी होणार आहे. NHAI खासगी वाहनांसाठी FASTag वार्षिक पास योजना सुरू करत आहे. केवळ तीन हजार रुपयांत वर्षभर निवडक महामार्गांवर टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. या योजनेमुळे वेळ, पैसा आणि टोल प्लाझांवरील गर्दी – तिन्ही गोष्टींवर नियंत्रण मिळणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI ने सांगितले आहे.
NHAI ने काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात मोठी घोषणा केली होती. खासगी वाहनांसाठी FASTag वार्षिक पास फक्त 3,000 रुपयांत वर्षभर ठराविक महामार्गांवर टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. यामुळे वेळ, खर्च आणि टोल प्लाझांवरील गर्दी तिन्ही गोष्टींवर नियंत्रण आणणं शक्य होणार आहे.
काय आहे ही योजना?
खाजगी कार, जीप, व्हॅन यांसारख्या खासगी वाहनांसाठी लागू
व्यावसायिक वाहनांना लाभ नाही
पास नोंदणीकृत वाहनापुरता मर्यादित
15 ऑगस्ट 2025 पासून देशभरातील सर्व NHAI महामार्गांवर अंमलात.
फायदे कसे मिळणार?
NHAI च्या माहितीनुसार सध्या वर्षभरात 200 टोल पार करण्याचा खर्च सुमारे 10,000 रुपये येतो. नवीन योजनेत एका टोलसाठी फक्त 15 रुपये दर लागू होणार, त्यामुळे 3,000 रुपयांतच काम भागेल. वारंवार लांब प्रवास करणाऱ्यांसाठी ही योजना सर्वात फायदेशीर ठरणार आहे.
नक्की वाचा - Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनांना सरकारचे स्वातंत्र्यदिनी मोठे गिफ्ट, 'या' मार्गावर टोल फ्री प्रवास
कोठे लागू होणार?
* मुंबई–रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग
* दिल्ली–मुंबई एक्स्प्रेस वे
* मुंबई–नाशिक महामार्ग
* मुंबई–सुरत मार्ग
राज्य महामार्ग आणि महापालिकेच्या टोल मार्गांवर – उदा. मुंबई–पुणे एक्स्प्रेसवे, समृद्धी महामार्ग, अटल सेतू – पास लागू नाही.
पास कसा मिळवाल?
1. *राजमार्ग यात्रा अॅप किंवा NHAI/MoRTH वेबसाइटला भेट द्या.
2. वाहन क्रमांक आणि FASTag आयडीने लॉगिन करा
3. 3,000 रुपये UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगने भरावे लागतील.
4. पास FASTag खात्याशी लिंक होईल
5. 15 ऑगस्टला SMS द्वारे ॲक्टिवेशनची माहिती मिळेल