Satara News : कर्ज देत नसल्याच्या रागातून बँक मॅनेजरवर जीवघेणा हल्ला, बँकेतच कोयत्याने वार

Satara Crime News : शेळी पालनासाठी आवश्यक कर्ज देत नाही, याचा राग मनात धरून आशुतोष सातपुते याने कश्यप यांच्यावर हल्ला केला. जिवंत ठेवणार नाही, असं म्हणत सातपुने यांना मॅनेजवर कोयत्याने वार केले. 

जाहिरात
Read Time: 1 min

सुजीत आंबेकर, सातारा

कर्ज देत नसल्याच्या रागातून बँक मॅनेजवर कोरयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील कराडमधील इंडियन ओवरसीज बँकेच्या कराड शाखेत हा सगळा प्रकार घडला आहे. या हल्ल्यात बँक मॅनेजर आशिष कश्यप जखमी झाले आहेत. तर रेठरे बुद्रुक येथील आशुतोष दिलीप सातपुते याने मॅनेजरवर हल्ला केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,  शेळी पालनासाठी आवश्यक कर्ज देत नाही, याचा राग मनात धरून आशुतोष सातपुते याने कश्यप यांच्यावर हल्ला केला. जिवंत ठेवणार नाही, असं म्हणत सातपुने यांना मॅनेजवर कोयत्याने वार केले. 

या हल्ल्यात बँक मॅनेजर कश्यप हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर कराडमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बँकेचे मॅनेजर हे मूळ बिहार राज्यातील असून हल्लेखोर हा कराड तालुक्यातील आहे.

Topics mentioned in this article