VIDEO: लग्नाच्या मंडपात नवरदेवावर हल्ला! ड्रोनवाल्याने सगळा थरार टिपला, पाठलागही केला

Amravati News: नवरदेव सुजलराम हा जखमी झाल्यावर, नववधू ही त्या ठिकाणी चक्कर येऊन पडली. नवरदेवाचे वडील आरोपींना पकडायला गेले असता त्यांच्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला.

जाहिरात
Read Time: 2 mins

शुभम बायस्कार, अमरावती

अमरावतीच्या बडनेरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नसमारंभात घुसून नवरदेवावर जीवघेणा हल्ल्या झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्या नवरदेव गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर पोलिसांना याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बडनेरा रोडवरील साहिल लॉनमध्ये सुरू असलेल्या लग्नसमारंभात मंगळवारी रात्री अचानक गोंधळ उडाला. साहिल लॉन येथे बडनेरा येथील सुजलराम समुद्रे याचा विवाह समारंभ सुरू असताना दोन युवकांनी नवरदेव सुजलराम समुद्रे याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. लग्नासाठी सुरू असलेल्या ड्रोन शूटमध्ये हा व्हिडीओ कैद झाला आहे.

(नक्की वाचा-  Sangli News : वाढदिवसाच्या दिवशीच दलित महासंघाच्या अध्यक्षांची हत्या! सांगलीत 'मुळशी पॅटर्न' स्टाईल खून)

नवरदेव सुजलराम हा जखमी झाल्यावर, नववधू ही त्या ठिकाणी चक्कर येऊन पडली. नवरदेवाचे वडील आरोपींना पकडायला गेले असता त्यांच्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. आरोपी दुचाकी वाहनावर बसून पळून गेल्याचा संपूर्ण व्हिडिओ ड्रोन कॅमेरात कैद झाला.

या हल्ल्यात नवरदेव गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर लग्नसमारंभात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच बडनेरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Shocking news: लिव्ह इन पार्टनरशी वाद, कारमध्ये स्वत:ला जिवंत जाळले, अंगाचा थरकाप उडवणारी घटना)

नवरदेव सुजल समुद्रे हा तिलक नगर परिसरातील रहिवासी आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून बडनेरा पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. यापूर्वी देखील बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही आरोपींनी धाब्यावर महिलेस मारहाण केली होती. त्यामुळे बडनेरा पोलीसाचा गुन्हेगारावर वचक राहिला नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे.

Topics mentioned in this article