Latur Crime News: चॉकलेटचा हट्ट करणाऱ्या चिमुकलीला गळा आवळून संपवलं; नराधम बापाला अटक

Latur Crime News : आरुषी बालाजी राठोड ही चार वर्षाची चिमुकली गतप्राण होईपर्यंत आरोपीने साडीचा फास काही सोडला नव्हता. आरुषीची आई वर्षा घरी आल्यानंतर तिला प्रकार लक्षात आला.

जाहिरात
Read Time: 2 mins

विष्णू बुरगे, लातूर

Latur Crime News : चॉकलेटसाठी हट्ट धरणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुकलीला नराधम पित्याने गळा आवळून संपवलं. लातूर जिल्ह्यातील भीमा तांडा येथील हा प्रकार संतापजनक आहे. आरोपी बापाला पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथील बालाजी बाबु राठोड  व्यक्तीला चार वर्षाची मुलगी आहे. बालाजी राठोड हा व्यसनाच्या आहारी गेला आहे. रविवारी दुपारी चार वर्षांच्या त्याच्या मुलीने चॉकलेटसाठी हट्ट धरला. त्यावेळी रागाच्या भरात असलेल्या बालाजी राठोड याने साडीने स्वतःच्या चार वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून केला आहे.

(नक्की वाचा-  Kolhapur News: शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्यांचा फोटो अन् अघोरी पूजा, कोल्हापूरमधील घटनेने खळबळ)

आरोपी बालाजी राठोड

आरुषी बालाजी राठोड ही चार वर्षाची चिमुकली गतप्राण होईपर्यंत आरोपीने साडीचा फास काही सोडला नव्हता. आरुषीची आई वर्षा घरी आल्यानंतर तिला प्रकार लक्षात आला. त्यानंतर तिने लगेचच उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. तपासाअंती हा गुन्हा बालाजीनेच केल्यास उघड झालं. 

(नक्की वाचा: ट्रॅक्टर शोरुममध्ये काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग, 'पगार वाढवून देतो' म्हणत दुष्कृत्य केलं)

उदगीर ग्रामीण पोलिसांचे पथक माहिती घेत असल्याची खबर बालाजीला लागली. त्यावेळी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तो पळून जात असतानाच त्याला पोलिसांना बेड्या ठोकल्या. पोलीस पुढील तपास करत आहेत..

Advertisement

माझ्या लेकराला त्याने मारून टाकले. त्याला फाशी द्या. त्याला असं सोडू नका, असा टाहो आरुषीची आई वर्षा हिने पोलिसांसमोर फोडला. आरुषीचे चुलते राजू राठोड यांनी देखील हतबल होत कैफियत मांडली. बालाजीने आम्हाला खूप त्रास दिला. वेगळं राहतो म्हमत घर वेगळे केलं. मला आणि आईला वाटणीसाठी त्रास देत होता.. बायकोबरोबर भांडत होता. मुलीला फाशी देऊन मारला. आम्हाला देखील जीवे मारण्याची धमकी देत होता, असं राजू राठोड यांनी सांगितलं. 

Topics mentioned in this article