अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:
FDA Tukaram Mundhe News: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने AI-सक्षम नागरिक तक्रार पोर्टल तयार केल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. या पोर्टलचा नागरिकांनी योग्य वापर करावा. एखाद्या पदार्थाकडे फक्त भेसळ आहे का एवढ्याच अँगलने न पाहता ते खाण्यायोग्य आहे का? हे सुद्धा तपासा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी बोलताना तुकाराम मुंढेंनी व्यावसायिकांना सर्वात मोठा इशारा दिला आहे.
काय म्हणाले तुकाराम मुंढे?
"सेफ फूड अँड सेफ ड्रग्स यातून महाराष्ट्रासाठी काम करायचं आहे. आपलं काम जनतेसाठी सेफ आणि स्टँडर्ड फूड उपलब्ध करून देणं आहे. जनता, इंडस्ट्री आणि रेग्युलेटर एकाच सिस्टिम चे भाग आहेतनागरिकांना आता तक्रार करण्यासाठी आता एक वेबसाईट तयार करण्यात आली आहे आणि त्यावर अधिकाऱ्यांनी सुद्धा उत्तर देणं बंधनकारक आहे. गेल्या २४ तासात राज्यभरात ५०० तक्रारी आल्या आहेत, अशी माहिती तुकाराम मुंढेंनी दिली.
Jalgaon Crime: महाराष्ट्र हादरला! नवऱ्याकडून ट्रॅक्टरचे भाडे थकले, 4 नराधमांनी बायकोची अब्रु लुटली
नागरिकांच्या त्यांचे सुरक्षित आरोग्य हेच सगळ्यात महत्वाचं तत्व आहे. राज्यातील आस्थापनांकडे योग्य तो आणि बंधनकारक परवाना नसेल तर १० लाख रुपयांचा दंड आता ठोठावला जाणार आहे. राज्यातील सगळ्यात जास्त तक्रारी या पुणे जिल्ह्यातील आहेत आणि unhygienic अन्न याबाबत सगळ्यात जास्त तक्रारींची नोंद झाल्या आहेत. माझा प्रयत्न हा सिस्टीम लावण्याचा च असतो, सगळ्यांनी स्टँडर्ड सिस्टिम मध्ये काम करावे, असंही तुकाराम मुंढेंनी सांगितलं आहे.
लायसन्स नसेल तर थेट १० लाखांचा दंड
"लायसन्स नसेल तर थेट १० लाखांचा दंड ठोठावला जाणार आहे. विना परवाना जर कोणी बिझनेस करत असेल तर थेट दंडात्मक कारवाई केली जाईल. याआधी आम्ही एवढा दंड करत नव्हतो मात्र आता मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. कीतीही छोटा उद्योग असला तरी त्याला दंड लावा असे आदेश दिले आहेत. त्यामुळे लायसन्स घ्या, रजिस्ट्रेशन घ्या ते ऑनलाईन मिळते त्यामध्ये काही अडचणी नाहीत. नियमांनुसार उद्योग करा," असं ते म्हणाले.