जाहिरात

Jalgaon Crime: महाराष्ट्र हादरला! नवऱ्याकडून ट्रॅक्टरचे भाडे थकले, 4 नराधमांनी बायकोची अब्रु लुटली

पोलिसांनी या चारही नराधमांना अटक केली आहे. जामनेर तालुक्यात महिन्याभरात सलग दुसऱ्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे खळबळ घडाली आहे. 

Jalgaon Crime: महाराष्ट्र हादरला! नवऱ्याकडून ट्रॅक्टरचे भाडे थकले, 4 नराधमांनी बायकोची अब्रु लुटली

मंगेश जोशी, जळगाव:

Jalgaon Crime:  शेतीसाठी भाड्याने घेतलेल्या ट्रॅक्टरचे पैसे न दिल्याने शेतकऱ्याच्या पत्नीवर सामुहिक अत्याचार केल्याची भयंकर घटना जळगावमध्ये घडली आहे. विकृतीचा कळस गाठणारी ही घटना जळगावच्या जामनेर तालुक्यात घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार नराधमांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. 

पतीने ट्रॅक्टरचे भाडे थकवले, नराधमांनी पत्नीचे लचके तोडले!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. ट्रॅक्टरचं भाडं न दिल्याच्या कारणावरून एका 30 वर्षीय विवाहितेवर चौघांनी सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या सामूहिक अत्याचारा प्रकरणी फत्तेपूर पोलीस स्टेशनमध्ये चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या चारही नराधमांना अटक केली आहे. जामनेर तालुक्यात महिन्याभरात सलग दुसऱ्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे खळबळ घडाली आहे. 

Samruddhi Highway: 'समृद्धी'वरुन प्रवास करताय? आधी 'हे' वाचा; वाहनचालकांची खैर नाही, पोलिसांच्या 15 टीम तैनात

जामनेर तालुक्यातील शेतकऱ्याने शेतीच्या कामासाठी ओळखीच्या व्यक्तीकडून भाड्याने ट्रॅक्टर घेतला होता. काही काळानंतर ट्रॅक्टरचे भाडे मागितले मात्र पैसे नसल्याने भाडे देण्यास विलंब झाला. याच रागातून नराधमांनी हे दृष्कृत्य केले. शेतकऱ्याची पत्नी एकटी असल्याचे पाहून चौघांनी तिला गाठले.  पीडित महिलेला एकटं गाठून गुंगीचं पदार्थ खायला देत तिच्यावर अत्याचार करण्यात आला.

चार नराधमांना अटक 

याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून फत्तेपूर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चारही संशयित आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे, जामनेर तालुक्यात महिनाभरात सामूहिक अत्याचाराची ही सलग दुसरी घटना असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

Maharashtra Rain: महाराष्ट्रावर आस्मानी संकट! 'या' जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा मोठा अलर्ट

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com