Maharashtra Politics: विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी पैशांचा व्यवहार, राज्याच्या राजकारणात खळबळ; प्रकरण काय?

Maharashtra Politics News: आम्ही जनतेची सेवा करण्याकरिता आलो आहे. मात्र मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करुन लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याचे काम सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रविण मुधोळकर, मुंबई: विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशाचा व्यवहार झाल्याचा खळबळजनक दावा भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांनी केला आहे. यामध्ये विरोधीपक्षातील आमदार आणि त्यांचे सात ते आठ जवळचे कार्यकर्ते सहभागी असल्याचे सांगत याची ॲाडीओ क्लिप मुख्यमंत्र्यांकडे सोपवली असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांनी केलेल्या दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशाचा व्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप परिणय फुके यांनी केला आहे. तसेच यामध्ये  विरोधीपक्षातील आमदार आणि त्यांचे सात ते आठ जवळचे कार्यकर्ते सहभागी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

या व्यवहाराची ॲाडीओ क्लिप मुख्यमंत्र्यांकडे सोपवली असून  या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी तसेच ऑडिओ क्लिपची फॅारेंसीक चौकशी झाल्यानंतर पोलीस कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. आम्ही जनतेची सेवा करण्याकरिता आलो आहे. मात्र मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करुन लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याचे काम सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

(नक्की वाचा-  बीडमधील पाचवा संतापजनक Video; आता तर क्रौर्याची हद्दच गाठली!)

काय म्हणाले परिणय फुके?

"गडचिरोली, भंडारा, गोंदियामध्ये मोठ्या प्रमाणात राईस मिल आहेत. त्यामध्ये अनेक चुका होतात, भ्रष्टाचार होतात. यामधला भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणू, तुम्हाला ब्लॅकलिस्ट करु, तुमचे कोट्यवधींचे नुकसान होईल, अशी धमकी देत ब्लॅकमेलिंग होत आहे. आत्ता सभागृहामध्ये गडचिरोली जिल्ह्यात 100 ते 150 राईस मिल्स पैकी निवडक सात राईस मिल्सची नावे लक्षवेधीत घेण्यात आले. विधानपरिषदेत ज्यावेळी याबाबतची लक्षवेधी लागली, त्याआधी संबंधित राईस मिलरने याची ऑडियो क्लीप मला आणून दिली," असे परिणय फुके म्हणाले. 

दरम्यान, या ऑडिओ क्लीपमध्ये पैशाची जी देवाणघेवाण झाली त्याबाबतची माहिती आहे. यामध्ये एका बड्या नेत्याचा निकटवर्तीय सहभागी आहे. असेही ते म्हणालेत. यामध्ये आता काय खुलासे होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Advertisement

(नक्की वाचा - Maharashtra BJP : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाची यादी ठरली! अनुभवी नेत्याला पहिल्यांदाच संधी?)