जाहिरात

Beed Crime : बीडमधील पाचवा संतापजनक Video; आता तर क्रौर्याची हद्दच गाठली!

धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करणारी व्यक्ती संतोष देशमुख यांचा सख्खा साडू असल्याची माहिती समोर आली आहे.

Beed Crime : बीडमधील पाचवा संतापजनक Video; आता तर क्रौर्याची हद्दच गाठली!

Beed Crime Video : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. माणसामध्ये इतकी क्रूरता कशी येऊ शकते, हे फोटो पाहताना असा सवाल निर्माण होतो. त्यानंतर सुरेश धसांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्याशिवाय संदीप क्षीरसागरचा कार्यकर्ता, प्रकाश सोळंखेचा कार्यकर्ता यांच्याकडून मारहाण केली जात असल्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर बीडमधील घटना पाहून  संताप व्यक्त करण्यात आला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

त्यानंतर आणखी एक संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या सख्ख्या साडूकडून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ दोन वर्ष जुना असल्याचं सांगितलं जात आहे. एका शेतामध्ये एका तरुणाला तिघांकडून काठी आणि पट्ट्याने मारहाण करीत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

Road Accident : रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रशासन अलर्टवर; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

नक्की वाचा - Road Accident : रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रशासन अलर्टवर; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

Latest and Breaking News on NDTV

या मारहाणीत तरुण अक्षरश: रक्तबंबाळ झाला आहे. दादा खिंडकर हा संतोष देशमुख यांचा सख्खा साडू असून त्याने या तरुणाला बेदम मारहाण केली. कौटुंबिक कारणातून ही मारहाण झाल्याची माहिती आहे. तर मारहाण होत असलेल्या तरुणाचं नाव ओंकार असल्याचं सांगितलं जात आहे. त्याला शेतात नेत मारहाण करण्यात आली. त्याच्या शर्ट रक्तबंबाळ झाल्याचं व्हिडिओमधून दिसत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: