इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सार्वजनिक ठिकाणी Live, जोरदार तयारी सुरू

महाराष्ट्रातील बसस्टॉप, थिएटर, ज्या ज्या ठिकाणी प्रशासनाच्या एलईडी स्क्रीन लावलेलेल्या आहेत त्या ठिकाणी इतिहासात पहिल्यांदाच शपथविधी सोहळा लाईव्ह दाखवला जाणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

येत्या 5 डिसेंबरला महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महायुतीला लँडस्लाइड यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळाही भव्यदिव्य स्वरुपात होणार असल्याची माहिती आहे. हा सोहळा एखाद्या लोकोत्सवाच्या स्वरुपात आझाद मैदान येथे संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच शपथविधी कार्यक्रमाचं सार्वजनिक ठिकाणी लाईव्ह प्रसारण होणार आहे.

नक्की वाचा - एकनाथ शिंदेंना नेमकं हवंय तरी काय? जवळच्या नेत्याने बोलता बोलता सांगून टाकलं

महाराष्ट्रातील बसस्टॉप, थिएटर, ज्या ज्या ठिकाणी प्रशासनाच्या एलईडी स्क्रीन लावलेलेल्या आहेत त्या ठिकाणी इतिहासात पहिल्यांदाच शपथविधी सोहळा लाईव्ह दाखवला जाणार आहे. नरेंद्र मोदी मुंबईत उतरल्यापासून संपूर्ण सोहळ्याचे लाईव्ह टेलिकास्ट केलं जाणार आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, मुकेश अंबानी यांसह अनेक बड्या नावांना प्रशासकीय निमंत्रण जाणार आहे. तब्बल ६० ते ७० हजारांच्या गर्दीत हा  शपथविधी सोहळा पार पडणार आहे. 

शपथविधी सोहळ्यासाठी कोण कोण येणार? 

- उद्धव ठाकरे, शरद पवारांसह सर्व बड्या नेत्यांना प्रशासकीय निमंत्रण 
- सर्व माजी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण जाणार 
- केंद्रातील भाजपचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती 
- मराठी कलाकार 
- मुंबई, महाराष्ट्रातील प्रमुख पदांवरील व्यक्ती 
- अंबानींसह सर्व बडे उद्योगपती 
- सीए, डॉक्टर आणि सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्ती
- 100 हून अधिक संत-महंत 
- बॉलीवूड, मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार 
- 10 हजार लाडक्या बहिणी
- अजय-अतुल, कैलास खेर यांचे सांस्कृतिक कार्यक्रम 
- 'जो राम को लाये है हम उनको लायेंगे' या गाण्याचे गायक कन्हैय्या मित्तल यांची उपस्थिती

नक्की वाचा - एक सस्पेन्स संपला : राज्याच्या मुख्यमंत्र्याआधी उपमुख्यमंत्री ठरला ! तटकरेंचे स्पष्ट संकेत

एकनाथ शिंदे अद्यापही नाराज?
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ खाटेवाटबावर नाराज असल्याची माहिती आहे. अद्यापही त्यांना मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा आहे, तर काहींच्या मते शिंदेंकडू गृहखात्याची मागणी केली जात आहे. मात्र विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकलेला भाजप या गोष्टीसाठी तयार नसल्याचं दिसतंय. त्यामुळे भाजपकडून या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू असली तरी एकनाथ शिंदे या सोहळ्याला जाणार की नाही हे लवकरच समोर येईल.