नालासोपारा पूर्व येथे बंद पडलेल्या खाणीत तयार झालेल्या तलावात दोन जण बुडाल्याची घटना समोर आली आहे. नालासोपारा पूर्वेच्या संतोष भुवन परिसरात ही घटना घडली आहे. दोघांचे मृतदेह मिळाले असून त्यांच्यासोबत असलेल्या तिघांचा शोध सुरु आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, पाच मुले खाणीतील तलावात पोहायला गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वजण बुडाले. अमित सूर्यवंशी (12 वर्ष) आणि अभिषेक शर्मा (12 वर्ष ) अशी मृत मुलांची नावे आहेत.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने 2 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. तर आणखी तीन सोबत असल्याने त्यांचा देखील शोध घेण्यात आला.
संपूर्ण तलावात अग्नीशमन दलाच्या जवानांनी शोध घेतला. मात्र तिघांचा शोध लागला नाही. त्यामुळे पाच पैकी दोघे जण बुडाले असावेत. त्यानंतर तिघे जण घाबरुन घटनास्थळावरुन पळून गेले असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. बेपत्ता असेलल्या 3 जणांचा शोध सुरु आहे.