पत्नीच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्यांने जीवन संपल्यांचा प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलीस दलातील 38 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलने शनिवारी टोकाचं पाऊल उचललं. विजय साळुंखे असं मृत पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय साळुंखे यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे. ज्यात त्यांना पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे.
(नक्की वाचा- सांगली महापालिका आयुक्तांचं व्हिजिटिंग कार्ड होतंय व्हायरल, काय आहे खास?)
विजय साळुंखे हे शाहू नगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. शुक्रवारी विजय हे ड्युटी संपल्यानंतर प्रतीक्षानगर येथील पोलीस क्वार्टरमधील आपल्या घरी गेले. त्याच रात्री त्यांना पंख्या गळफास लावून जीवन संपवलं. ज्यावेळी त्यांनी आत्महत्या केली, तेव्हा घरात ते एकटेच होते.
(नक्की वाचा - ATM मधून पैसे काढण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार?)
काही वेळात कुटुंबिय घरी परतले त्यावेळी विजय हे मृतावस्थेत घरात आढळले. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना तिथे एक सुसाईड नोटही सापडली. ज्यामध्ये विजय सोळुके यांना आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास करत आहेत.
VIDEO
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world