Amravati to Mumbai Flight : अमरावती-मुंबई विमानसेवा 15 दिवसांसाठी बंद, कारण काय?

अमरावतीकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अमरावतीहून मुंबईला जाणारी विमानसेवा १५ दिवसांसाठी बंद राहणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Amravati to Mumbai flight : अमरावतीकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अमरावतीहून मुंबईला जाणारी विमानसेवा १५ दिवसांसाठी बंद राहणार आहे. १ डिसेंबर ते १५ डिसेंबरपर्यत अमरावती - मुंबई विमानसेवा बंद राहणार असल्याची माहिती आहे. 

विमानसेवा का बंद राहणार? 

अमरावती - मुंबई विमानसेवा १५ दिवसांसाठी बंद राहणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दाट धुक्ंयामुळे प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना मेसेज करून याबाबत माहिती देण्यात आली. १५ डिसेंबरनंतरही विमानसेवा सुरळीत होणार की नाही हे हवामानावर अवलंबून असेल. मात्र १५ दिवसांहून जास्त काळ विमानसेवा बंद असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. 

पुण्यातही विमानसेवा विस्कळीत...

पुण्यात सलग सहाव्या दिवशी विमान उड्डाण उशीराने धावत आहे. उत्तरेतील दाट धुके आणि एअरलाइनकडून घेतली  जाणारी विमानाची देखभाल दुरुस्तीचा विमानसेवेवर परिणाम झाला आहे. पुण्यातून कोलकात्ता, दिल्ली, नागपूर, जयपूर अमृतसर, बंगळुरू या शहरातून येणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. 

विमानाला उशीर होत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शनिवारपासून विमान उड्डाणांना उशीर होत आहे. मध्यरात्री 12 ते सकाळी ६ या दरम्यान येणाऱ्या विमानांना दिरंगाईचा सामना करावा लागत आहे. इंडिगोची बरीच विमानं रद्द किंवा लेट होत आहेत. पुण्यात ३ डिसेंबरला  ८ ते १० विमानं रद्द झाल्या होत्या. आजही तीच परिस्थिती आहे. दुसरीकडे पायलटची संख्या कमी असल्याचं सांगितलं जात आहे. 

Advertisement


 

Topics mentioned in this article