सुनील दवंगे, शिर्डी
ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शिवेसना उद्धव ठाकरेंच्या तीन निष्ठावंत शिवसैनिकांवर पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राहता नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, माजी नगरसेवक सागर लुटे आणि नगरसेविका उज्ज्वला होले यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. या निर्णयामुळे राहता तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिकांत मोठी नाराजी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. निष्ठावंत शिवसैनिकांना पत्रकार परिषदेतच अश्रू अनावर झाल्याचे दिसून आलं.
राहता नगरपालिका निवडणुकीत राजेंद्र पठारे हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते. तर सागर लुटे आणि उज्ज्वला होले या नगरसेवकपदासाठी उमेदवार म्हणून इच्छुक होते. मात्र महाविकास आघाडीत सामील न होता, तसेच पक्षाचा एबी फॉर्म भरल्याने या तिघांवर कारवाई करण्यात आली.
(नक्की वाचा- Viral VIDEO: फोनवरचं बोलणं ऐकून Uber ड्रायवरने गाडी थांबवली अन्... तरुणीच्या आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण)
तर पक्षाचा एबी फॉर्म “चोरल्याचा” आरोप पक्षाचे नेते अनिल देसाई यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राहता–शिर्डी तालुक्यात पक्षातील अंतर्गत तणाव तीव्र झाला आहे. ठाकरे सेनेत बाळासाहेब थोरात यांचा मोठा हस्तक्षेप असल्याचा आरोप नाराज शिवसैनिकांकडून करण्यात आला.
(नक्की वाचा- kalyan News: "मराठी बोलायला लाज वाटते का?", ट्रेनमधील मारहाणीनंतर तणावातून मराठी तरुणाची आत्महत्या)
गेल्या 30 वर्षांपासून पक्षात कार्यरत असलेले राजेंद्र पठारे यांनी जिल्हा उपप्रमुखासह अनेक पदांवर काम केल्याचं सांगत शिवसेना पक्ष जिवंत ठेवण्यासाठी दिवसरात्र एक केली. “विखे समर्थकांनी माझे घर जाळले, आंदोलनात अनेक केसेस अंगावर घेतल्या, पण पक्ष कधीच सोडला नाही. निष्ठावान शिवसैनिकांना असा न्याय मिळत असेल तर ते अयोग्य आहे, अशी भावना देखील राजेंद्र पठारे यांनी व्यक्त केली. तर शिवसेना फुटली तेव्हा एकनाथ शिंदे यांच्यासोबत न जाता उद्धव ठाकरेंसोबत राहिलो. मशाल घाती घेतली मात्र आता या पश्चाताप येत असल्याच देखील राजेंद्र पठारे यांनी स्पष्ट केलं.