राणा पती-पत्नीत जागा वाटपावरून मतभेद? रवी राणांच्या जागांवर नवनीत यांचा डोळा

रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने महायुतीत काही जागांवर दावा केला आहे. विशेष म्हणजे त्या जागा भाजपलाच मिळाल्या पाहीजे असा हट्ट नवनीत राणा यांनी धरला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
अमरावती:

माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राण हे राजकारणातलं बहुचर्चीत दाम्पत्य आहे. नवनीत राणा यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी रवी राणा यांनी जोरदार प्रचार केला होता. त्या निवडून याव्या यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न ही केले होते. पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. नवनीत राणा यांना पराभव स्विकारावा लागला. लोकसभेला नवनीत राण यांनी युवा स्वाभिमान पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सध्या तरी हे पती पत्नी वेगवेगळ्या पक्षात काम करत आहेत. आता विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. त्यात रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने महायुतीत काही जागांवर दावा केला आहे. विशेष म्हणजे त्या जागा भाजपलाच मिळाल्या पाहीजे असा हट्ट नवनीत राणा यांनी धरला आहे. त्यामुळे या पती पत्नीत सध्या जागा वाटपावरून मतभेद असल्याचे दिसून येत आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये आमदार रवी राणा यांचा पक्ष महायुतीमध्ये  आहे. मात्र आमदार रवी राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील बडनेरासह अचलपूर, मेळघाट, दर्यापूर या चार जागा आपल्या युवा स्वाभिमान पक्षाला मिळाव्या यासाठी अंबादेवीकडे साकडं घातलं आहे. रवी राणा हे स्वता बडनेराचे आमदार आहेत. तर  अचलपूरमधून त्यांचे कट्टर विरोधक बच्चू कडू हे आमदार आहेत. महायुतीत हा मतदार संघ शिवसेना शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. तर मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हे शिंदे गटात जाणार आहेत. त्यामुळे हा मतदार संघही शिवसेनेकडे जाणार हे निश्चित आहे. दर्यापूर मतदार संघ हा शिवसेनेच्या अभिजित अडसुळ यांचा मतदार संघ त्यामुळे हा मतदार संघही राणा यांना सुटण्याची शक्यता कमी आहे.  

ट्रेंडिंग बातमी - महायुतीत कोकणात धुसफूस? गुप्त बैठकांचा सपाटा, कदम- सामंतांचे टेन्शन वाढले

दुसरीकडे आमदार रवी राणा यांच्या पत्नी माजी खासदार नवीन राणा या आता भाजपमध्ये आहेत. त्यांनी सुद्धा रवी राणा यांनी दावा केलेल्या मेळघाट,दर्यापूर, अचलपूर  या मतदार संघावर दावा केला आहे. हे मतदार संघ भाजपलाच मिळावेत अशी मागणी केली आहे. इथला उमेदवार हा कमळ या चिन्हावरच उभा राहिला पाहिजे असं त्या म्हणाल्या. शिवाय त्यांनी भाजपचा प्रचार ही या मतदार संघात सुरू केला आहे. नवनीत राणा यांनी घेतलेल्या या भूमीकेमुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. त्यामुळे सध्या तरी राणा दाम्पत्यामध्ये अमरावतीतील जास्तीत जास्त विधानसभेच्या जागा मिळवण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. 

ट्रेंडिंग बातमी - 'लाडकी बहीण योजना भिकारी जीवन जगण्याची सवय लावणारी' सरकारला थेट नोटीस

दरम्यान नवनीत राणा या भाजपच्या नेत्या आहेत. त्यामुळे त्यांची मागणी रास्ता आहे, अशी प्रतिक्रिया त्यांचे पती आणि आमदार रवी राणा यांनी दिली आहे. मात्र पक्ष हा घराच्या बाहेर आहे. घरामध्ये आम्ही दोघे एकत्र आहोत. घराच्या बाहेर आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहोत. माझा युवा स्वाभिमान पक्ष आहे. त्यामुळे मी कोणत्याच पक्षाचा आजपर्यंत सदस्य झालो नाही. पुणे  होणार पण नाही असे रवी राणा म्हणाले. नवनीत राणा या भाजपच्या नेत्या आहेत. त्यांची भाजपला जागा मिळाल्या पाहीजेत अशी भूमीका आहे. तर युवा स्वाभिमान पक्षाला जास्त जागा मिळाल्या पाहीजे ही आपली भूमीका असल्याचे रवी राणा म्हणाले.