लाडकी बहीण योजनेचा सध्या महायुती सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केला जात आहे. भावा कडून बहीणीला भाऊबीज अशा पद्धतीची जाहीरात केली जात आहे. शिवाय निवडणुकीच्या तोंडावर हीच योजना आता प्रचाराचा केंद्र बिंदू ठरत आहे. त्यात आता ट्वीस्ट निर्माण झाला आहे. महायुती सरकारने सुरू केलेली ‘लाडकी बहीण योजना' कायमस्वरूपी रोजगार मिळवून न देता भिकारी जीवन जगण्याची सवय लावणारी आहे, असा आरोप करणारी कायदेशीर नोटीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री अजित पवार, मुख्य सचिव, महिला व बालविकास मंत्रालयाला पाठविण्यात आली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही योजना राजकीय फायद्यासाठी आणली गेली आहे. निवडणुका डोळ्या समोर ठेवून राजकीय लाभ मिळावा म्हणून लाडकी बहीण योजना आणली गेली आहे असा आरोप ज्येष्ठ पत्रकार-लेखक आणि राजकीय विश्लेषक विनय हर्डीकर यांनी केला आहे. त्यांनी याबाबत अॅड. असीम सरोदे यांच्या मार्फत थेट राज्य सरकारलाच नोटीस पाठवत अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. दिड हजार रूपयात महिलांचे आर्थिक स्वातंत्र्या, पोषण, आरोग्य कसे काय सुधारणार अशी विचारणा केली आहे. त्यामुळे या नोटीसला सरकार काय उत्तर देते हे पाहाले लागणार आहे.
ट्रेंडिं न्यूज - जन्मदात्या पित्याकडूनच पोटच्या लेकीवर अत्याचार, 4 वर्षानंतर 'असं' फुटलं बिंग
राजकीय फायद्यासाठी जनतेचे पैसे वाटणे, कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेत बसत नाही असेही या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजना राजकीयदृष्ट्या प्रेरित असून, केवळ निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून लागू केली आहे, असे या नोटिशीमध्ये नमूद केले आहे. शिवाय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही योजना सुरू केल्याने या योजनेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, असेही यात म्हटले आहे.
ट्रेंडिंग बातमी - LIVE UPDATE : नवी मुंबई विमानतळावर पहिलं विमान आज उतरणार
लाडकी बहीण योजनेमुळे जवळपास 46 हजार कोटींचा खर्च होणार आहे. शिवाय या योजनेसाठी राज्य सरकारने तीन हजार कोटीचे कर्ज ही काढल्याचे समोर येत आहे. या योजनेमुळे सध्या राज्याची वित्तीय तुट ही 4.6 टक्क्यांनी वाढली आहे. आर्थिक शिस्तीच्या राज्यासाठी ही गोष्ट चांगली नाही. तीन टक्के वित्तीय तूट अपेक्षित असते. पण ही त्या पेक्षाही जास्त आहे. त्यामुळे राज्याची आर्थिक घडीच यामुळे कलमडून पडणार आहे असेही या नोटीसमध्ये म्हटले आहे.
ट्रेंडिंग बातमी - अमिताभ बच्चन यांच्या 'या' सिनेमात रतन टाटांनी गुंतवले पैसे, पण...
महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेनुसार महिलांना दरमहा सरकार दिड हजार रूपये देणार आहे. सरकारने महिलांना याचे दोन हाफ्तेही थेट बँक खात्यात जमा केले आहेत. या योजने विरोधात कोर्टातही काही जणांनी याचिका दाखल केली होती. आता विनय हर्डीकर यांनी सरकारला या प्रकरणी थेट नोटीस पाठवली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world