Wardha News : माजी खासदारांना राम मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारणारे पुजारी कोण? मंदिर विश्वस्तांकडून कारवाई

रामदास तडस यांना राममंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारणाऱ्या पुजाऱ्याला बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Wardha News : वर्ध्यात भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्याला धक्कादायक प्रकार समोर आला होता. प्रवेश नाकारल्यानंतर देवळीतील गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. अखेर देवळी राम मंदिर विश्वस्तांनी याची दखल घेत कारवाई केली आहे. रामदास तडस यांना राममंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारणाऱ्या पुजाऱ्याला बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रामदास तडस सकाळी 10 वाजता देवळीच्या राम मंदिरात सपत्नीक पूजा करायला गेले होते. तडस सपत्निक पूजेसाठी तडस हे गर्भगृहात शिरत असताना पुजाऱ्याने त्यांना मधेच रोखलं होतं. देवळीतील राम मंदिरातील ही घटना वाईट अनुभव घेणारी आहे, असं  रामदास तडस यांनी म्हटलं होतं. यावर मंदिराच्या विश्वस्तांनी कारवाई केली आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Mumbai News : वेळेत रुग्णवाहिका पोहोचली नाही, आमदार निवासात कार्यकर्त्याचा हृदयविकाराने मृत्यू

मुकुंद चौरीकर बरखास्त...

देवळी येथील राम मंदिरात दर्शनाच्या वेळी माजी खासदार रामदास तडस यांच्या सोबत झालेला व्यवहार अत्यंत दुर्दैवी आणि चुकीचा आहे. घटनेत असलेले मुकुंद चौरीकर यांना बरखास्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचं मंदिराचे विश्वस्त सचिन वैद्य यांनी कळवलं आहे. मंदिरातील नियमित पुजारी त्या दिवशी गैरहजर असल्यामुळे त्यांच्या जागी गाभाऱ्यात असलेले पुजारी चोरीकर हे वयोवृद्ध व जुन्या विचारायचे असल्यामुळे त्यांच्याकडून ही चूक झाली.  तडस यांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गाभाऱ्यात येऊन दर्शन घ्यायला मुळीच हरकत करायला नको होती. त्यांच्या या व्यवहाराशी मंदिराचे विश्वस्त अजिबात सहमत नाहीत. मंदिरामध्ये सर्वांचे स्वागत आहे, सर्वांचा सन्मान आहे. आजपर्यंत कोणीही भेदभाव केलेला नाही. त्यांच्या या कृत्याबद्दल मंदिराच्या विश्वस्त मंडळांनी त्यांना बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात असा गैरप्रकार होणार नाही याची आम्ही हमी देतो असे  मंदिराचे विश्वस्त सचिन वैद्य यांनी कळवलेले आहे.

Advertisement