पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी लांडगे उद्या ठाकरे गटात पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांचे पुतणे आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दिवंगत बाबासाहेब लांडगे यांचे पुत्र रवि लांडगे यांनी अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्या (20 ऑगस्ट) मुंबईत मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांनी भाजप रुजविली. महापालिकेत भाजपचे दोन अंकी नगरसेवक निवडून आणले, लांडगे घराण्याचा राजकीय वारस म्हणून रवि पुढे आले.
नक्की वाचा - हे कुठल्या युतीधर्मात बसतं? रामदास कदमांच्या वक्तव्यावर फडणवीसांचा संताप
2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत रवि लांडगे भाजपचे बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले होते. रवि लांडगे व त्यांचे कुटुंबीय पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भाजपचे सर्वात जुने निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. उद्या मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता रवी लांडगे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मुंबईत मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world