विशाल पुजारी, कोल्हापूर
कोल्हापुरातील कागल तालुक्यातील वेदगंगा नदीत चार बुडाल्याची घटना समोर आली आहे. सर्वजण नदीवर धुणे धुण्यासाठी गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने चारही जण बुडाले. चौघांपैकी तिघांचे मृतदेह सापडले आहेत. तर एकाचा शोध सुरु आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका व्यक्ती समावेश आहे. तर मुलगाा अद्याप सापडलेला नाही.
जितेंद्र लोकरे ( वय 36 वर्ष), रेश्मा दिलीप यळमल्ले (वय 34 वर्ष), सविता अमर कांबळे अशी मृतदेह सापडलेल्यांची नावे आहेत. यश दिलीप यळमल्ले (17) याचा अद्याप शोध सुरु आहे. अणूर गावात बस्तवडे येथील वेदगंगा नदीच्या बंधाऱ्यावर चौघेजण धुणे धुवायला गेले होते. आणूर येथे पाहुण्यांच्या घरी यात्रेनिमित्त हे सर्वजण आलेले होते.