Sunetra Pawar Emmanuel Macron Viral Video: फ्रान्सचे पंतप्रधान इम्यॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron India Visit) हे मंगळवारी (17 फेब्रुवारी) मुंबई दौऱ्यावर आहेत. सोमवारी (16 फेब्रुवारी) रात्री उशीरा त्यांचे मुंबईत आगमन झाले. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर होते. मॅक्रॉन यांचे या सर्व मान्यवरांनी स्वागत केले. यावेळी मॅक्रॉन आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात झालेल्या संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मॅक्रॉन आणि सुनेत्रा पवारांमध्ये संवाद
फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी काही सेकंद थांबून संवाद साधला. पुरुष नेत्यांच्या रांगेत महिला नेताही उभी आहे, हे पाहून मॅक्रॉन यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. त्यांनी सुनेत्रा पवारांसोबत संवाद साधला आणि त्यांना नमस्कार केला. हा व्हिडीओ पाहून सुनेत्रा पवार आणि इम्यॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron Sunetra Pawar Viral Video) यांच्यामध्ये नेमकी काय बातचित झाली असेल, असा प्रश्न सर्वांना पडलाय.
(नक्की वाचा: Narhari Zirwal News: 'पक्षाच्या प्रतिमेची काळजी घ्या', लाच प्रकरणी सुनेत्रा पवारांची नरहरी झिरवळांकडे नाराजी)
कसा असेल इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचा मुंबई दौरा? (Emmanuel Macron Visits Mumbai)
- फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंगळवारी एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या महत्त्वपूर्ण मॅक्रॉन मुंबईत आले आहेत.
- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मॅक्रॉन तसेच त्यांच्या पत्नी ब्रिगिट यांचे स्वागत केले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष मॅक्रॉन यांची मंगळवारी महाराष्ट्र लोकभवन येथे बैठक होणार आहे. पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन मंगळवारी संध्याकाळी हे गेटवे ऑफ इंडिया येथे होत असलेल्या 'इंडिया - फ्रांस यिअर ऑफ इनोव्हेशन अँड कल्चरल कमेमोरेशन' या कार्यक्रमात सहभागी होतील.