Milk Price Hiked : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आजपासून गाय आणि म्हशीच्या दूध दरात वाढ करण्यात आली आहे. दोन रुपयांनी ही वाढ करण्यात आली असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला याची झळ बसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन रुपयांनी वाढ झाल्यानंतर गायीचं दूध प्रतिलिटर 58 रुपयांनी तर म्हशीचं दूध प्रतिलिटर 74 रुपयांपर्यंत पोहोचलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बुधवारी 12 मार्च रोजी दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाची बैठक पार पडली. या बैठकीत दूधदरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत विविध सहकारी आणि खासजी दूध संघाचे 47 प्रतिनिधी उपस्थित होते. 15 मार्च म्हणजे आजपासून दुधाचे नवीन दर लागू होतील अशी माहिती आहे. आतापर्यंत गायीच्या दुधासाठी एका लिटरसाठी 54 ते 56 रुपये आकारले जात होते, आता यात वाढ होऊन 56-58 पर्यंत पोहोचलं आहे.
नक्की वाचा - Shocking! आधी धुळवडीचा जल्लोष, नंतर काळाचा घाला; राज्यात 9 जणांचा मृत्यू
दुसरीकडे म्हशीच्या एका लिटर दुधाची किंमत 70-72 वरुन 72-74 पर्यंत पोहोचली आहे.