जाहिरात

Shocking! आधी धुळवडीचा जल्लोष, नंतर काळाचा घाला; राज्यात 15 जणांचा मृत्यू

राज्यभरात आनंदाचा सण साजरा केला जात असताना या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Shocking! आधी धुळवडीचा जल्लोष, नंतर काळाचा घाला;  राज्यात 15 जणांचा मृत्यू

Holi 2025 : होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवटीनिमित्त राज्यभरात मोठ्या उत्साहाचं वातावरण होतं. सोसायट्यांमध्ये एकत्र येत आनंदाने होळी साजरी केली जात होती. नागरिकांनी डीजेचा ठेका धरला होता. मटणाच्या दुकानाबाहेर एक ते दीड किलोमीटर रांगाही लागल्या होत्या. सर्वत्र आनंदाचं वातावरण असताना सणाला गालबोल लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. 

इंद्रायणी नदीत पोहायला गेलेल्या 4 जणांचा, बदलापुरातील उल्हास नदीत 3 जणांचा, वसईत अपघातादरम्यान 2, गडचिरोलीत 1, नागपुरात 1, छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 आणि वसईत झालेल्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यभरात आनंद साजरा केला जात असताना राज्यातील 15 जणांचा मृत्यू झाला आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

1 - धुळवट साजरी केल्यानंतर नदीत पोहायला गेलेल्या सात तरुणांचा हकनाक मृत्यू झाला. देहुरो ड जवळील किन्हई गावाजवळील इंद्रायणी नदीच्या पात्रात बुडून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्य  झाला आहे. रोहित गौतम कांबळे, विशाल दिलीप अचमे, आकाश विठ्ठल गोरडे अशी या दुर्घटनेतील मृतांची नावं आहेत. घरकुल चिखलीहून 4 ते 5 तरुण हे धुळवट खेळण्यासाठी या परिसरात आले होते. दुपारी 3 ते 3.30 च्या दरम्यान इंद्रायणी नदीच्या पात्रात पोहत असताना यातील तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देहूरोड पोलिसांनी दिली आहे. 

Vasai News: होळी दहन करून घरी येत असताना मामा भाच्यावर काळाचा घाला

नक्की वाचा - Vasai News: होळी दहन करून घरी येत असताना मामा भाच्यावर काळाचा घाला

2. दुसऱ्या घटनेत धुळवड खेळून झाल्यानंतर रंग धुण्यासाठी म्हणून चार तरुण बदलापुरातील उल्हास नदीत गेले होते. पण नदीत उतरल्यानंतर त्यांना पाण्याचा काही एक अंदाज आला नाही. एका मागो माग हे चार ही तरुण नदीच्या पाण्यात बुडाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. आर्यन मेदर, आर्यन सिंग, सिद्धार्थ सिंग आणि ओमसिंग तोमर अशी या चौघांची नावं आहेत. विशेष म्हणजे हे चौघे ही अवघ्या पंधरा सोळा वर्षांचे आहेत. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा डोंगर कोसळला आहे.

3. तिसऱ्या घटनेत प्रल्हाद व मनोज दोघे होळी दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी ढेकाले येथे गेले होते. होळीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते दुचाकी वरून घरी परत येत होते. त्यांची दुचाकी मुंबई अहमदाबाद महामार्गावर भरोळ गावाजवळ आली होती. त्यावेळी त्यांचे दुचाकी वरचे नियंत्रण सुटले. त्यानंतर त्यांच्या दुचाकीने संरक्षण भिंतीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

Badlapur News: धुळवड खेळून रंग धुण्यासाठी नदीत गेले, 4 जणांचा बुडून मृत्यू

नक्की वाचा - Badlapur News: धुळवड खेळून रंग धुण्यासाठी नदीत गेले, 4 जणांचा बुडून मृत्यू

4. सर्वत्र धूलिवंदन उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असतांनाच ऐन सणाच्या दिवशीच देसाईगंज शहरातील एका १९ वर्षीय युवकाचा देसाईगंज-ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी 14 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. अथर्व हिवराज सहारे वय 19 वर्षे असे मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे.

5. नागपूर जिल्ह्यातील बूटीबोरी येथे उड्डाणपुलावरून महिंद्रा 700 कार कोसळून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बूटीबोरी - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील बूटीबोरी येथील टी-पॉईंटवर घडला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: