Gadchiroli News: भटक्या कुत्र्यांचा हैदोस! 10 जणांचे लचके तोडले, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

परिसरात मोकाट कुत्र्याने धुडगूस घातल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून  बाहेर पडणेही मुश्कील झाले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मनिष रक्षमवार, गडचिरोली: जळगाव शहरातील समता नगर परिसरात एका भटक्या कुत्र्याने 11 जणांना चावा घेतल्याने खळबळ उडाली होती. दुर्दैवी म्हणजे याच कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यूही झाला. ही घटना ताजी असतानाच आता गडचिरोलीमध्येही भटक्या कुत्र्याने हैदोस घातल्याचे समोर आले आहे. गडचिरोलीच्या सिंरोचा शहरात भटक्या कुत्र्याच्या दहशतीमुळे नागरिकांचे फिरणे मुश्कील झाले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गडचिरोलीच्या सिरोंचा  शहरात मोकाट कुत्र्यांचा धुडगूस काही थांबायला तयार नाही. गेल्या आठवड्यात मोकाट कुत्र्यांनी काही जणांना चावा घेतल्याची घटना घडली होती. हे प्रकरण ताजे असतानाच 2 जून रोजी आणखी दहा जणांवर हल्ला केला. या घटनेने शहरात दहशतीचे वातावरण आहे.

शहरातील पटवारी कॉलनी, कोत्तागुङम येथे धुमाकूळ घातला. पटवारी कॉलनी, कोत्तागुडम, वार्ड क्र. 5 येथे मागील काही दिवसांपासून पिसाळलेले कुत्रे भटकत होते. मात्र, त्याबद्दल कोणीही काळजी घेतली नाही. 2 जूनला येथे फिरणाऱ्या पिसाळलेल्या कुत्र्याने दहा लोकांना चावा घेतला. यात तीन लहान मुलांचाही समावेश आहे. दरम्यान, जखमींनी आरडाओरड केल्यानंतर इतर नागरिक काठ्या, दगडे घेऊन धावले, त्यानंतर कुत्र्यांनी पळ काढला.

नक्की वाचा - Crime News: पहिल्यांदा चाकूने भोसकलं, मग जाळण्याचा प्रयत्न... माथेफिरू प्रियकराचं भयंकर कृत्य

कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या सर्वांवर योग्य तो उपचार सुरू आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, परिसरात मोकाट कुत्र्याने धुडगूस घातल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून  बाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. 

Advertisement