जाहिरात

Train News: कोकणवासियांसाठी गुडन्यूज! सावंतवाडी स्टेशनवर 'या' गाड्या थांबणार; गणेशोत्सव स्पेशल ट्रेनचीही घोषणा

मध्य रेल्वेने गणेशोत्सवासाठी विविध विशेष गाड्यांच्या फेऱ्यांची अधिकृत घोषणा केली असून, २४ जुलै रोजी यासंदर्भातील अधिसूचना अधिकृतपणे जारी करण्यात आली आहे.

Train News: कोकणवासियांसाठी गुडन्यूज! सावंतवाडी स्टेशनवर 'या' गाड्या थांबणार; गणेशोत्सव स्पेशल ट्रेनचीही घोषणा

Ganeshotsav Special Trains 2026: ​आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुखकर व आरामदायी व्हावा यासाठी एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून, रेल्वे मंत्रालयाने सावंतवाडी रोड स्थानकावर राजधानीसह ३ प्रमुख लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर नियमित थांबा मंजूर केला आहे. यासोबतच मध्य रेल्वेने गणेशोत्सवासाठी विविध विशेष गाड्यांच्या फेऱ्यांची अधिकृत घोषणा केली असून, २४ जुलै रोजी यासंदर्भातील अधिसूचना अधिकृतपणे जारी करण्यात आली आहे.

सावंतवाडी स्थानकावर मंजूर झालेले नवीन थांबे व वेळापत्रक|  New Stops At Sawantwadi Train Timetable

  •  गाडी क्रमांक १२१३३ सीएसएमटी ते मंगळुरू एक्स्प्रेस ही सावंतवाडीत सकाळी ०७:०२ वाजता पोहोचून ०७:०४ वाजता सुटणार
  •  गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू ते सीएसएमटी ही रात्री २३:३० वाजता येऊन २३:३२ वाजता सुटेल आणि २७ जुलैपासून लागू होईल. 
  • हजरत निजामुद्दीन ते तिरूवनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस (आठवड्यातून ३ दिवस)
  •  गाडी क्रमांक १२४३२ निजामुद्दीन ते तिरुवनंतपुरम ही सावंतवाडीत सकाळी ०६:१८ वाजता (प्रस्थान ०६:२०) २६ जुलैपासून सावंतवाडीत थांबेल.
  • गाडी क्रमांक १२४३१ तिरुवनंतपुरम ते निजामुद्दीन ही सकाळी ०९:४४ वाजता (प्रस्थान ०९:४६) २८ जुलैपासून थांबेल.
  •  एलटीटी ते त्रिवेंद्रम गरीब रथ एक्स्प्रेस (आठवड्यातून २ दिवस)
  •  गाडी क्रमांक १२२०१ एलटीटी ते त्रिवेंद्रम पहाटे ०२:०२ वाजता (प्रस्थान ०२:०४) २७ जुलैपासून सावंतवाडीत थांबेल
  • गाडी क्रमांक १२२०२ त्रिवेंद्रम ते एलटीटी पहाटे ०३:२८ वाजता (प्रस्थान ०३:३०) ३० जुलैपासून सावंतवाडीत थांबेल.

    Maharashtra Rain: अतिवृष्टीचा इशारा! पुढील 4 दिवस तुफान पाऊस; आज कुठे कुठे बरसणार? वाचा...

​मध्य रेल्वेच्या 'गणेशोत्सव विशेष गाड्या'| Ganeshotsav Special Trains 2026

 सीएसएमटी - सावंतवाडी - सीएसएमटी दैनिक स्पेशल (गाडी क्र. ०१०३१ / ०१०३२) १ ते २७ सप्टेंबर १६ फेऱ्या सीएसएमटीवरून दुपारी १५:३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ०४:०० वाजता सावंतवाडीला पोहोचेल.

एलटीटी - सावंतवाडी - एलटीटी दैनिक स्पेशल (गाडी क्र. ०१०७१ / ०१०७२) ही १ ते २८ सप्टेंबर दरम्यान १७ फेऱ्या मारणार असून एलटीटीवरून सकाळी ०८:२० वाजता सुटून रात्री २१:०० वाजता सावंतवाडीला पोहोचेल.

दिवा - खेड - दिवा मेमू दैनिक (गाडी क्र. ०११५५ / ०११५६) १ ते २७ सप्टेंबर दरम्यान १६ फेऱ्या मारणार असून दिवा येथून सकाळी ०७:१५ वाजता सुटून खेडला दुपारी १४:३५ वाजता पोहोचेल.

पुणे - रत्नागिरी - पुणे साप्ताहिक स्पेशल (गाडी क्र. ०९४४५ / ०९४४६) १२ ते २६ सप्टेंबर दरम्यान पुण्यातून मध्यरात्री ००:२५ वाजता सुटून रत्नागिरीत सकाळी ११:५० वाजता पोहचेल.

दिवा - चिपळूण - दिवा (गाडी क्र. ०११३३ / ०११३४) १ ते २८ सप्टेंबर दरम्यान १५ फेऱ्या मारणार असून दिवा येथून दुपारी १३:४० वाजता सुटेल. तसेच एलटीटी ते मडगाव, रत्नागिरी व सावंतवाडीसाठी साप्ताहिक व द्विसाप्ताहिक विशेष फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.

Gadchiroli News: नक्षलवादी पुन्हा सक्रीय!'त्या' बॅनर अन् पत्रकाने खळबळ, स्थानिकांत भिती, पोलीस सतर्क

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com