Maharashtra Rain Alert News: महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यभरात पावसाचा जोर तीव्र होण्याची चिन्हे आहेत. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचे सावट अधिक गडद झाले असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असून कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार सरी बरसणार आहेत.
Gadchiroli News: नक्षलवादी पुन्हा सक्रीय!'त्या' बॅनर अन् पत्रकाने खळबळ, स्थानिकांत भिती, पोलीस सतर्क
राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील चार दिवस महत्त्वाचे!
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा आक्रमक रूप धारण केले आहे. कोकण आणि गोवा विभागातील बहुतांश जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली असून, दक्षिण मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी सरी कोसळू शकतात. उत्तर मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
हवामान विभागाच्या ताज्या सूचनेनुसार, आज २६ जुलै रोजी पुणे घाट परिसरासाठी अत्यंत गंभीर मानला जाणारा 'रेड अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी आणि सातारा घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवत 'ऑरेंज अलर्ट' घोषित करण्यात आला आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मात्र तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे.
याशिवाय ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट परिसर तसेच संपूर्ण विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या या इशाऱ्यानंतर यंत्रणा सज्ज झाली असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world