Ganpati Visarjan Rain Update : मुसळधार पावसात बाप्पाला निरोप! मुंबई-पुण्यात कशी असेल पावसाची स्थिती?

Ganpati Visarjan 2025 Rain News : गणेश विसर्जनासाठी जाण्याचा प्लान करीत असाल तर पावसाचा अलर्ट जाणून घ्या.

जाहिरात
Read Time: 3 mins
यंदा गणेश विसर्जनावरही पावसाचं सावट पाहायला मिळत आहे

Ganpati Visarjan Rain Update : गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात पावसाची संततधार सुरू आहे. गेले दहा दिवस मुंबई उपनगरात पावसाची संततधार सुरू होती. गणपतीच्या विसर्जनाला पाऊस उसंत घेईल अशी आशा गणेश भक्तांकडून व्यक्त केली जात होती. मात्र रात्रीपासून पावसाने जोर धरला (Maharashtra Rain Update) आहे. आज दिवसभर मुंबई आणि मुंबई उपनगरात हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. 

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, जळगाव  जिल्ह्याला पावसाचा यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Mumbai Pune Rain News)

मुंबईत गणेश गल्लीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पावसात गणेशभक्तांचा उत्साह थोडाही कमी झालेला नाही. पुण्यात सकाळी पावसाने विश्रांती घेतल्याचीही माहिती आहे. हवामान विभागाकडून यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. 

गणेश विसर्जनासाठी मुंबईत कडक बंदोबस्त l Mumbai Ganpati Visarjan 2025

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शहरात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आलीय. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विसर्जनाच्या वेळी भाविकांची गर्दी विचारात घेऊन बंदोबस्ताची मोठी तयारी करण्यात आली आहे.

Advertisement

नक्की वाचा - Ganpati Visarjan LIVE Update: मुंबईतील पहिल्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, परळचा राजा मार्गस्थ

पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी l Pune Ganpati Visarjan 2025

पुण्यात आज सकाळी 9:00 वाजल्यापासून गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून, मिरवणूक संपेपर्यंत (7 सप्टेंबरपर्यंत) खालील रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील.

शिवाजी रोड: काकासाहेब गाडगीळ पुतळा चौक ते जेधे चौक (सकाळी 7:00 पासून)
लक्ष्मी रोड: संत कबीर चौक ते अलका टॉकीज चौक (सकाळी 7:00 पासून)
बाजीराव रोड: सावरकर चौक ते फुटका बुरूज चौक (दुपारी 12:00 पासून)
कुमठेकर रोड: टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक (दुपारी 12:00 पासून)
गणेश रोड: दारूवाला पूल ते जिजामाता चौक (सकाळी 10:00 पासून)
केळकर रोड: बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक (सकाळी 10:00 पासून)
टिळक रोड: जेधे चौक ते टिळक चौक (सकाळी 9:00 पासून)
शास्त्री रोड: सेनादत्त चौकी चौक ते अलका (दुपारी 12:00 पासून)
जंगली महाराज रोड: झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक (सायं. 4:00 पासून)
कर्वे रस्ता: नळ स्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौक (सायं. 4:00 पासून)
फर्ग्युसन रोड: खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेनगेट (सायं. 4:00 पासून)
भांडारकर रस्ता: पीवायसी जिमखाना ते गुडलक चौक ते नटराज चौक (सायं. 4:00 पासून)
पुणे-सातारा रोड: व्होल्गा चौक ते जेधे चौक (सायं. 4:00 पासून)
सोलापूर रोड: सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक (सायं. 4:00 पासून)
प्रभात रोड: डेक्कन पोस्टे ते शेलारमामा चौक (सायं. 4:00 पासून)
बगाडे रोड: सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक (सकाळी 9:00 पासून)
गुरू नानक रोड: देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक (सकाळी 9:00 पासून)

Advertisement