Nagpur News: सावधान! तुमच्या सोशल मीडियावर पोलिसांची 'गरुडदृष्टी', आक्षेपार्ह पोस्ट कराल तर...

Nagpur Police News: नागपूर पोलिसांनी 24 तास कार्यरत असणारे सायबर मॉनिटरिंग सुरू केले आहे. दरम्यान, काही दोषींवर पोलिसांनी कारवाईही केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रविण मुधोळकर, नागपूर: सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे अनेक वाद, धार्मिक तणाव वाढल्याची प्रकरणे वारंवार समोर येत आहेत. समाजकंटकांकडून अनेकदा तेढ निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो, आक्षेपार्ह, वादग्रस्त पोस्ट केल्या जातात ज्यामुळे अनेकदा मोठ्या दंगलीही भडकल्याचे पाहायला मिळाले. याचबाबत आता नागपूर पोलिसांनी एक सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 17 मार्च रोजी नागपूरमध्ये झालेल्या दंगलीमागे सोशल मीडियावरील वादग्रस्त मजकूर कारणीभूत ठरला होता. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यानही सोशल मीडियावर वादग्रस्त मजकुराचा पूर आला होता. या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी 24 तास कार्यरत असणारे सायबर मॉनिटरिंग सुरू केले आहे. दरम्यान, काही दोषींवर पोलिसांनी कारवाईही केली आहे.

अशा वादग्रस्त मजकुराचा शोध घेऊन त्यावर तातडीने कारवाई करण्यासाठी ‘गरुड दृष्टी' या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून 24 तास सतत नजर ठेवली जाणार आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्ती सोशल मीडियावर जे कीवर्ड्स वापरतात, त्यांची माहिती या सॉफ्टवेअरमध्ये आधीच फीड करण्यात आली आहे. जेव्हा कोणी हे कीवर्ड्स वापरतो, तेव्हा काही सेकंदांतच ‘गरुड दृष्टी' सॉफ्टवेअरला याची माहिती मिळते.

Vaishnavi Hagawane Case: हगवणे पिता-पुत्राला थार देणाऱ्या चोंधे फॅमिलीची काळी कुंडली! ब्लॅकमॅजिक, पोरींचा नाद अन् सुनांचा छळ

त्या आधारावर पोलिसांना संबंधित व्यक्तीचे लोकेशन समजते. पोलीस त्या ठिकाणी जाऊन संबंधित व्यक्तीला समज देतात; प्रकरण गंभीर असल्यास त्या व्यक्तीला ताब्यातही घेतले जाईल. नागपूरच्या सदर परिसरातील सायबर पोलीस स्टेशनमध्ये ‘गरुड दृष्टी' सॉफ्टवेअरसह ही सायबर लॅब उभारण्यात आली आहे.

Advertisement

दरम्यान, यासोबतच  माओवादी संदर्भातील अर्बन नक्षलवाद्यांच्या सोशल मीडियावरील हालचालींवरही ‘गरुड दृष्टी' अ‍ॅप लक्ष ठेवणार आहे. कारमध्ये किंवा बाईकवर वादग्रस्त रील्स तयार करणाऱ्या, वादग्रस्त कंटेंट शेअर करणाऱ्यांवरही सोशल मीडिया लॅब 24 तास लक्ष ठेवणार आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त रविंदर सिंगल यांनी याबाबतची माहिती दिली आहे.